Shweta-Pardeshi 
मनोरंजन

नृत्यातूनच वाढली अभिनयाची ओढ!

श्वेता परदेशी, अभिनेत्री

प्रीमियर - श्वेता परदेशी, अभिनेत्री
नृत्य माझ्यासाठी सर्वस्व आहे; पण अभिनय करायलाही तितकेच आवडते. माझ्या करिअरला सुरुवात झाली ती नृत्यापासूनच, मात्र आता मी अभिनय क्षेत्राकडेही वळण्याचा प्रयत्न करीत आहे. वडील नृत्यदिग्दर्शक असल्याने मी त्याच वातावरणात मोठी झाले. नृत्याचे धडे आणि आवड घरातूनच मिळाली. वडिलांना पाहून मलाही याच क्षेत्रात ओढ वाढली. मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच नृत्य करू लागले व मंचावर सादरीकरण केले. तिथूनच माझ्या नृत्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.

मी वयाच्या सातव्या वर्षी एका मालिकेत बालकलाकार म्हणून काम केले. शिक्षण घेत असताना नृत्य, अभिनयात करिअर करण्याचा माझा विचार नव्हता; पण पुढे नृत्यामधील माझी आवड अधिक वाढली. त्याचसोबत अभिनयाबद्दलचे कुतूहलही होतेच. मी बारावीचे शिक्षण झाल्यावर अभिनय क्षेत्रासाठी तयारी करण्याचा मी निश्चय केला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याकडून मी अभिनयाचे धडे घेण्यास सुरुवात केली. मी बायोटेक्नॉलॉजीमधून पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. मी २०११मध्ये यूआरडीएमध्ये नृत्यशिक्षक म्हणून दाखल झाले. डान्स रिअॅलिटी शो ‘डीआयडी सीझन ४’मध्ये भाग घेतला आणि टॉप १५पर्यंत पोचले. मी मॉडेलिंग क्षेत्रातही काम केले. माझ्या आजवरच्या प्रवासामध्ये आई-वडिलांचा खूप मोठा वाटा आहे.

‘झी युवा’ वाहिनीवरील ‘अप्सरा आली’ लावणीविशेष कार्यक्रमातून मी प्रेक्षकांसमोर आले. लावणी माझ्यासाठी नवीन आव्हान होते. कारण, माझ्या नृत्याचा कल हा नेहमीच वेस्टर्न, बॉलिवूड, फोक, हिप-हॉप, कंटेमप्ररी याकडे होता. त्यामुळे लावणी करणे, हे एक आव्हान होते आणि ते मी पेलले. माझ्या नृत्यांना प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. आता मला अभिनेत्री म्हणून वेगळी ओळखही मिळत आहे. मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत ‘आटपाडी नाइट्स या चित्रपटातून मी प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचे  लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर आहेत.

‘अतंरदाह’, ‘इंद्रभुवन’ अशा चित्रपटांतून मी काम केले आहे. ‘संघर्ष जीवनाचा’, ‘ये भोग एक तपस्या’ या मालिकांमधूनही काम केले. ‘अ मिस्टेक’ ही शॉर्ट फिल्मही केली आहे. मी स्वतः दिग्दर्शन आणि अभिनय केलेल्या गाण्यांचा अल्बम मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. पुढील वर्षी २०२०मध्ये हिंदी वेबसीरिज आणि चित्रपटांतून मी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
(शब्दांकन - ऋतुजा कदम) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT