ranbir kapoor alia bhatt vicky kaushal love and war movie sanjay leela bhansali  SAKAL
मनोरंजन

Love and War Movie: रणबीर-आलियाचा नवीन सिनेमा, जोडीला विकी कौशल! भन्सालींनी केली घोषणा

रणबीर-आलिया-विकीच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय

Devendra Jadhav

Love and War Movie News: संजय लीला भन्सालींच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय. रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांच्यासोबत भन्साली 'लव्ह अँड वॉर' नावाच्या नवीन चित्रपटासाठी एकत्र येत आहेत.

यानिमित्ताने भन्साली १७ वर्षानंतर पुन्हा एकदा रणबीर कपूरसोबत काम करणार आहेत. याशिवाय 'गंगूबाई काठियावाडी'च्या यशानंतर भन्साली आलियासोबत पुन्हा एकत्र आले.

'लव्ह अँड वॉर' चित्रपटाच्या निमित्ताने 17 वर्षांनंतर भन्साली आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र येत आहेत.

काल बुधवारी २४ जानेवारीला या सिनेमाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटाची बातमी कौशलने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विकी, आलिया आणि रणबीर कपूर यांच्या स्वाक्षऱ्यांसह घोषणा करण्यात आली.

रणबीर-आलियाने 'लव्ह अँड वॉर' सिनेमाची कथा ऐकली. आलियाने सुरुवातीलाच हा सिनेमा साईन केला असून आता सिनेमाची टिम रणबीरला करारबद्ध करुन घेण्यास उत्सुक आहे.

याशिवाय विकी कौशलसुद्धा संजय लीला भन्सालींसोबत पहिल्यांदा काम करण्यास उत्सुक आहे. विकीला सुद्धा सिनेमाची कथा प्रचंड आवडली असल्याचं समजतंय. हा सिनेमा ख्रिसमस २०२५ रोजी भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

Baramati by-election News: बारामती पोटनिवडणूक : कॉंग्रेसची अखेर माघार, आकाश मोरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला

LPG Supply: होर्मुज मार्ग पुन्हा बंद! भारतात तेल टँकर येणार की नाही? केंद्र सरकारने प्लॅन B सांगितला, मोठी अपडेट समोर

Leopard enters house kitchen : बिबट्या थेट स्वयपाक घरात आला अन् पाहुणा झाला..., घायाळ बिबट्याला घरातून कसं काढलं बाहेर

SCROLL FOR NEXT