मनोरंजन

लकी अलीच्या मुलीचे फोटो पहिल्यांदाच समोर; नेटकऱ्यांना साराची भुरळ

बॉलीवूडमध्ये आपल्या गायकीनं श्रोत्यांना वेड लावणारा गायक म्हणून लकी अलीची ओळख आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये आपल्या गायकीनं श्रोत्यांना वेड लावणारा गायक म्हणून लकी अलीची ओळख आहे. त्याला आतापर्यत चाहत्यांचा मिळालेला प्रतिसादही मोठा आहे. आजही त्याच्या गाण्याला मिळणारी पसंती मोठी आहे. आतापर्यत लकी अली यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा सोशल मीडियावरुन प्रसिद्ध झाल्या होत्या. लकी अली यांनी देखील त्या अफवांना फारसं महत्व दिलं नाही. सध्या त्यांच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स करत अनेक कमेंटही दिल्या आहेत. चाहत्यांना लकी अलीच्या मुलीबद्दल फारसे माहिती नाही. तिचं नाव सारा अनारा अली असं आहे. तिचा फॅन्सी लूक चांगलाच व्हायरल झाला आहे.

लोकप्रिय पॉप सिंगर म्हणून लकी अली यांची ओळख आहे. त्यांची आणि नफीसा अली सोधी यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी चाहत्यांना माहिती नाही. सोशल मीडियावरही त्या फारशा आलेल्या नाहीत. यावेळी नफीसा अली यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन काही फोटो शेयर केले आहेत.

सध्या लकी अली यांच्या सारा अलीचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात नफीसा यांनी लिहिलं आहे की, माझा मित्र लकी अली याची दुसरी मुलगी. लकीस्टार.

सारा अली ही लकी अली यांची दुसरी पत्नी इनन्या यांची मुलगी आहे. साराचे फोटो पाहून तिला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहे. तिचे फोटो पाहून तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.

एका फोटोमध्ये सारानं नफीसा यांच्या कोकोला हातात घेतलं आहे. त्यावेळी नफीसा यांच्या चाहत्यांनी ती गोष्ट हेरुन साराला कमेंट केल्या आहेत. तेव्हा सारा आता तुही गायिका होणार का, असा प्रश्न विचारला आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोनानं लकी गेले अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यावर लकी अली यांना त्यावरुन सोशल मीडियावरुन सांगावं लागलं होतं की, मी ठीक आहे. माझी प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितलं होतं. गेल्या काही दिवसांत त्यांचा गोव्यातील ओ सनम नावाचा व्हि़डिओही व्हायरल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT