lucky ali 
मनोरंजन

गायक लकी अली यांनी चाहत्यांना दिलं सरप्राईज, गोव्यामधील व्हिडिओ होतोय व्हायरल

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- लकी अली भारतीय संगीतातील तो आवाज आहे ज्यासाठी कोणत्याही वयातील माणुस वेडा होईल. लकी अली यांची गाणी नेहमीच मनाला भिडतात. गेल्या कित्येक काळापासून ते पडद्यापासून लांब आहेत. त्यांचे चाहते त्यांना खूप मिस करत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच लकी अली यांचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामुळे त्यांचे चाहते खूपंच भावूक झाले. आता पुन्हा एकदा लकी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून त्यांचे चाहते आनंदाने नाचायला लागतील.  

लकी अली ९०च्या दशकातील ते नाव आहे ज्यांची गाणी आजही अनेकांच्या ओठावर आहेत. काही दिवसांपूर्वीच लकी अली यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या ब्लॅक एँड व्हाईट व्हिडिओमध्ये लकी अली गिटार हातात घेऊन चेह-यावर हास्य ठेवत ओ सनम गाणं गात होते. आता पुन्हा एकदा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. बॉलीवूड अभिनेत्री नफीसा अलीने नुकतंच त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लकी अली यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये लकी अली ओ सनम हे गाणं गात आहेत. हा व्हिडिओ गोव्यामधील आहे जिथे लकी अली लोकांच्या गर्दीत बसून हे गाणं गात आहेत. व्हिडिओतून लकी आली यांचा दर्दभरा आवाज कळून येत आहे. गिटारसोबत लकी अली यांना गाताना पाहून ९०च्या दशकातील तेच चित्र समोर येतं जेव्हा ते स्टेजवर लाईव्ह प्रेक्षकांसमोर गाणं गायचे. या व्हायरल व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे ते गाण्यातील एक लाईन मर भी गए तो गाऊन थोडावेळ थांबतात तेव्हा तिथे उपस्थित असलेले चाहते पुढच्या ओळी गात गाणं पूर्ण करतात.

लकी अली प्रसिद्ध अभिनेते महमूद यांचा मुलगा आहे. संगीताच्या खास शैलीमध्ये आणि त्यांचा जबरदस्त आवाजाने त्यांनी आत्तापर्यंत अनेक गाण्यांना आवाज दिला आहे. मात्र ते नेहमीच लाईमलाईट पासून लांब राहिले. असं असलं तरी त्यांचे चाहते त्यांना विसरलेले नाहीत.    

lucky ali singing o sanam in goa video goes viral on internet  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT