Lust Stories 2 Tamannaah Bhatia opened about reaction esakal
मनोरंजन

Tamannaah Bhatia Lust Stories 2 : तमन्नाच्या त्या सीनवर काय होती घरच्यांची प्रतिक्रिया? 'मी तर...'

काही दिवसांपूर्वी तमन्नानं आपण कोणत्याही प्रकारचे बोल्ड सीन देणार नाही असे म्हटले होते.

सकाळ डिजिटल टीम

Lust Stories 2 Tamannaah Bhatia opened about reaction : प्रसिद्ध अभिनेत्री तमन्नानं सध्या तिच्या लस्ट स्टोरीज चित्रपटात जे काही केलं आहे त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते आहे. काही दिवसांपूर्वी तमन्नानं आपण कोणत्याही प्रकारचे बोल्ड सीन देणार नाही असे म्हटले होते. प्रत्यक्षात तिचा लस्ट स्टोरीज नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली.

सोशल मीडियावर तमन्ना भाटिया ही चर्चेत आहे. त्याचे कारण तिची नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीजमुळे चाहत्यांनी तमन्ना आणि तिचा बॉयफ्रेंड विजय वर्मा यांना दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट असल्याचे दिसून आले आहे. यावेळी तमन्नाला एका मुलाखतीमध्ये तिच्या बोल्ड सीनवरुन प्रश्न विचारण्यात आला होता. कुटूंबासमवेत हा चित्रपट पाहताना तुझी पहिली प्रतिक्रिया काय, घरच्यांना काय वाटले....

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

बोल्ड सीन केला आणि तो जर तुमच्या परिवारासमवेत पाहण्याची वेळ आली तर खूपच ऑकवर्ड होतं. ती वेळ लवकर टळून जावी असे मला वाटते. घरच्यांनाही मला सांगताना खूपच टेंन्शन होतं. पण आता काय करणार माझे ते काम आहे. आणि त्यामुळे तो सीन जेव्हा घरच्यांसोबत पाहण्याची वेळ आली तेव्हा मात्र मलाच काय करावे हे कळेना. माझ्याशी बराचवेळ कुणीच काही बोलले नाही.

तो सीन जेव्हा सुरु झाला तेव्हा तर तो पटकन संपावा असे वाटत होते. आणि बाकीचे काहीही न बोलता ते सगळं पाहत होते. मीच आपली दुसरीकडे तोंड फिरवून बसले होते. अशी प्रतिक्रिया तमन्नानं दिली आहे. तिच्या या प्रतिक्रियेची देखील जोरदार चर्चा होताना दिसते आहे. गेल्या काही दिवसांपासून नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीजची चर्चा आहे. त्यातील काही सीन्स, डायलॉग यामुळे हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे.

लस्ट स्टोरीजमध्ये चार वेगवेगळ्या स्टोरीज मांडण्यात आला आहे. त्याचा केंद्रबिंदू स्त्री हा आहे. यामध्ये तमन्ना भाटिया, काजोल, विजय वर्मा, कुमूद मिश्रा, मृणाल ठाकूर, नीना गुप्ता, अमृता सुभाष यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यासगळ्यात मात्र तमन्ना भाटियाच्या भूमिकेवरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT