Odhani song from Made in China Movie  
मनोरंजन

'मेड इन चायना' चं पहिल गाणं प्रदर्शित, मौनीच्या ठुमक्यांवर प्रेक्षक फिदा

वृत्तसंस्था

मुंबई : राजकुमार राव आणि मौनी राय यांचा आगामी चित्रपट 'मेड इन चायना' चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये राजकुमार एका वेगळ्याच लुकमध्ये दिसतोय. तर एकुणच ट्रेलरवरुन लक्षात येतं आहे की हा चित्रपट भरपूर कॉमेडी आणि मजेशीर असणार आहे. नुकतेच या सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित झाले आहे.

'ओढणी' असं या गाण्याचं नाव असून प्रेक्षकांकडून गाण्याला पसंती मिळतेय. गाण्यामध्ये मौनी आणि राजकुमार एकत्र दिसत आहेत. त्यांच्या जबरदस्त परफॉरमन्सने सर्वांनाच हैराण केलं आहे.  मौनीच्या ठुमक्यांवर प्रेक्षक फिदा झाले असून गाणं प्रदर्शित झाल्यावर ते लगेचच व्हायरल झालं आहे. 

जुन्या 'ओढणी' गाण्याला रिक्रेएट करण्यात आलं आहे. गाण्याला दर्शन रावल, नेहा कक्कर आणि सचिन-जिगर यांनी आवाज दिला. सचिन-जिगर यानेच हे गाणं तयार केलं. नीरेन भट्ट आणि जिगर सरैया यांनी गाणं लिहिलं आहे. काही तासांपूर्वी युट्युबवर अपलोड केलेल्या या गाण्याला जवळपास साडेतीन लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. 

बोमन ईराणी, परेश रावल, सुमित व्यास, राजकुमार राव आणि मौनी रॉय अशी दमदार कास्ट असलेल्या या चित्रपटाची कथा एका गुजराती व्यापारावर आधारीत आहे. हा चित्रपट दिवाळीला म्हणजेच 24 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT