Madhavan Son Vedaant Wins 5 Gold Medals  
मनोरंजन

R Madhavan Son Vedant : लेकाची पाच गोल्ड मेडलची कमाई, बापाच्या डोळ्यात पाणी!

देवाचा आशीर्वाद आणि त्याची कृपा यामुळे सारं काही घडत आहे. मी त्याचे मनापासून आभार मानतो. अशा शब्दांत आर माधवननं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

युगंधर ताजणे

R Madhavan Son Vedaant Wins 5 Gold Medals In Malaysia : बॉलीवूड आणि टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आऱ माधवन हा नेहमीच त्याच्या प्रयोगशीलतेमुळे ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे. त्यानं त्याच्या आजवरच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. आता मात्र चर्चा आर माधवनची नाहीतर त्याच्या मुलाची होते आहे.

गेल्या काही दिवसांपासून आर माधवनच्या मुलानं वेदांतनं देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यानं मलेशियामध्ये झालेल्या जलतरण स्पर्धेमध्ये पाच सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. आर माधवननं पोस्ट करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यानं खास कॅप्शन देत शेयर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. त्यानं आपल्याला आज खूप आनंद आणि गर्व वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

देवाचा आशीर्वाद आणि त्याची कृपा यामुळे सारं काही घडत आहे. मी त्याचे मनापासून आभार मानतो. अशा शब्दांत आर माधवननं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. वेदांतनं ५०, १००, २००, ४०० आणि १५०० मीटरमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. यापूर्वी देखील वेदांतनं प्रभावी कामगिरी करुन साऱ्यांना चकित केले होते.

आर माधवनच्या त्या पोस्टनंतर मोठ्या प्रमाणात वेदांतवर कौतूकाची थाप पडताना दिसत आहे. बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी देखील त्याचे कौतूक केले आहे. यापूर्वी देखील बॉलीवूडच्या काही कलावंतांनी आर माधवनच्या वेदांतची स्तुती करत त्याला शाबासकी दिली होती. त्याला शुभेच्छाही दिल्या होत्या. वेदांतनं या अगोदर ज्या स्पर्धांमध्ये भाग घेतला त्यामध्ये त्यानं प्रत्येकवेळी सुवर्ण कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये वेदांतनं महाराष्ट्राकडून सहभागी होत खेलो इंडियामध्ये भाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT