Madhura Naik On Israel Hamas War  esakal
मनोरंजन

Israel-Hamas War: अभिनेत्री मधुरा नाईकची बहिण अन् दाजींची इस्त्राईलमध्ये हत्या! 'मला देखील...'

मधुराचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

युगंधर ताजणे

Madhura Naik On Israel Hamas War - टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा नाईकच्या बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्त्राईलमध्ये सध्या जे काही सुरु आहे त्यात तिची बहिण आणि पती यांची हत्या करण्यात आल्याचे अभिनेत्रीनं सांगितले आहे.

मधुराचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. हमास या दहशतवादी संघटेननं दोन दिवसांपूर्वी इस्त्राईलवर क्षेपणास्त्रं डागली होती. त्यात अनेक नागरिकांचा बळी गेला होता. याशिवाय मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील झाल्याचे व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाले होते.

Also Read - केवळ स्त्री म्हणून कामाचा मोबदला कमी मिळतो..?

त्या व्हिडिओमध्ये मधुरानं इस्त्राईलला सपोर्ट केले आहे. आणि ज्यांनी आपल्या कुटूंबातील सदस्यांची हत्या केली त्यांना योग्य ती शिक्षा व्हायला हवी. असेही तिनं म्हटले आहे. बहिण आणि दाजी यांचे जाणे आपल्यासाठी खूपच मोठा धक्का असल्याचे मधुरानं म्हटले आहे. पॅलेस्टाईमधील काही दहशतवाद्यांनी आक्रमक होत इस्त्राईलला धारेवर धरले आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष अद्याप सुरुच आहे.

आता या युद्धामध्ये अभिनेत्री मधुरा नाईकचे कुटूंबही होरपळ्याचे दिसून आले आहे. मधुरा ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून तिनं प्यार की एक कहानी, इस प्यार को क्या नाम दू, हमने ली है शपथ आणि तुम्हारी पाखी नावाच्या मालिकांमध्ये काम केले आहे. मधुराचा चाहतावर्गही मोठा आहे. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

व्हिडिओमध्ये मधुरा म्हणते की, मी मधुरा नाईक. भारतात जन्मलेली यहुदी आहे. भारतात आम्हा लोकांची संख्या ही तीन हजार आहे. आणि सात ऑक्टोबरपूर्वी आमच्या कुटूंबात खूपच वेदनादायी प्रकार घडला. आम्ही एक मुलगी आणि मुलगा यांना गमावले आहे. माझी बहिण ओडाया आणि तिचे पती यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या मुलासमोर त्यांची हत्या करण्यात आली होती.

सध्या माझ्या परिवाराच्याबाबत जे काही होते आहे ते खूपच भयानक आहे. मला शब्दांत सांगता येणार नाही. आम्ही खूपच वेगळ्या परिस्थितीतून जात आहोत. आज इस्त्राईल खूप संकटात आहे. हमासनं जे काही केले आहे त्याचा फटका अनेकांना बसतो आहे. माझी बहिण आणि तिच्या पतीचा फोटो शेयर करण्यात आला होता. मी यहुदी आहे म्हणून मला देखील खूपच अपमानित करण्यात आले.असेही मधुरानं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT