Aai Kuthe Kay Karte fame Madhurani Prabhulkar shared a car ride video and gives inspiring caption viral  sakal
मनोरंजन

Madhurani Prabhulkar: "रिग, कॅमेरा आणि घाटातला प्रवास", 'आई कुठे काय करते'च्या शुटिंग वेळीचा थरारक अनुभव

Vaishali Patil

आई कुठे काय करते ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका बनली आहे. या मालिकत आईची भुमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर ही घरघरात पोहचली आहे. या मालिकेतील तीची 'आई' म्हणजेच 'अरुंधती' ही भूमिका प्रेक्षकांची प्रचंड लोकप्रिय आहे.

मधुराणी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती अनेकदा खूप सुंदर अशा वैचारिक पोस्ट शेअर करताना दिसते. त्याचबरोबर तिच्या शुटिंगचे काही अनुभवही ती चाहत्यांसोबत शेयर करतांना दिसते.

तिने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओत ती 'आई कुठे काय करते' या मालिकेचे शुटिंग करत आहे.

या व्हिडिओत ते गाडी चालवतांनाचा शुट करत आहेत. हा व्हिडिओ शेयर करत मधुराणीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'रोज नवीन काहीतरी शिकत असतो आपण...! गाडी चालवायला आवडतेच मला. पण तशी उशीरा शिकले चालवायला . अलिकडेच म्हणायला हवं. गाडी येणं ह्याचे अनेक फायदे वेळोवेळी अनुभवले. पण अशी कधी गाडी चालवू असा विचारही केला नव्हता.

'रिग , कॅमेरा , आणि घाटातला प्रवास त्यात घाटात गाडी सांभाळायची, संवाद म्हणायचे, इमोशन्स सांभाळायच्या , रस्त्यावरचं लक्ष ढळू द्यायचं नाही. ही तारेवरची कसरत होती.सुरुवातीला जरा भीती वाटली पण नंतर मजा यायला लागली. भीती ची भावना पार केली तरच अनुभव गाठीशी गोळा होतात. नाहीतर आपण तिथेच राहतो , नाही का !'

सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. या मालिकेत निरंजन कुलकर्णी, अभिषेक देशमुख, अश्विनी महांगडे, मिलिंद गवळी, अपूर्वा गोरे हे महत्वाच्या भुमिका साकारतात. या मालिकेत अनेक ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : चर्चगेट रेल्वे परिसरात झाड कोसळून तीन वाहनांचे नुकसान; पावसाची संततधार कायम

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT