madhurani prabhulkar and sharvari jamenis sakal
मनोरंजन

दिल, दोस्ती : घट्ट मैत्रीच्या ‘फूटप्रिंट्स’!

कोणत्याही कलेबद्दल आपल्या मनात प्रेम आणि आदर असला, की ती कलेची आवड दोन व्यक्तींना एकत्र आणते. मधुराणी प्रभुलकर आणि शर्वरी जमेनीसच्या बाबतीत असंच काहीसं झालं.

सकाळ वृत्तसेवा

कोणत्याही कलेबद्दल आपल्या मनात प्रेम आणि आदर असला, की ती कलेची आवड दोन व्यक्तींना एकत्र आणते. मधुराणी प्रभुलकर आणि शर्वरी जमेनीसच्या बाबतीत असंच काहीसं झालं.

- मधुराणी प्रभुलकर - शर्वरी जमेनीस

कोणत्याही कलेबद्दल आपल्या मनात प्रेम आणि आदर असला, की ती कलेची आवड दोन व्यक्तींना एकत्र आणते. मधुराणी प्रभुलकर आणि शर्वरी जमेनीसच्या बाबतीत असंच काहीसं झालं. मधुराणीनं आपल्या निवेदनानं, अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ घातली; तर शर्वरीनं आपल्या नृत्यानं. अनेक वर्षं त्या एकमेकींना ओळखत होत्या, परंतु ६ ते ७ वर्षांपूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची भेट झाली. पुढं मधुराणीच्या ‘कवितेचं पान’ या कार्यक्रमाच्या एका भागात शर्वरी सहभागी झाली होती आणि नंतर विविध शहरांमध्ये त्यांनी हा कार्यक्रम लाइव्ह सादर केला, त्या पाठोपाठ शर्वरीच्या ‘फूटप्रिंट्स’ या

कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा मधुराणी सांभाळली. त्यातूनच त्यांच्यातली मैत्री अधिकाधिक घट्ट होत गेली.

शर्वरी म्हणाली, ‘मधुराणी सहजपणे सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी मुलगी आहे. त्यामुळं तिच्याबरोबर काम करताना मला कधीही टेन्शन येत नाही. मधुराणीचा आणि माझा स्वभाव बऱ्यापैकी विरुद्ध आहे. ती शांत, तर मी थोडी हायपर आहे. या विरुद्ध स्वभावानं आपण नात्यात छान समतोल साधू शकतो. कार्यक्रमांच्या निमित्तानं आम्ही बराच प्रवास एकत्र केला, त्यामुळं मला तिला व्यवस्थित जाणून घेता आलं. मी आतापर्यंत कधीही तिला चिडलेलं किंवा कुठल्याही गोष्टीच्या टेन्शनमध्ये पाहिलं नाहीये. कोणत्याही परिस्थितीत ती शांत राहून मार्ग काढते. मला असं वाटतं की, माझी नाळ त्या व्यक्तींशी जुळते ज्यांची संवेदनशीलता माझ्या संवेदनशीलतेच्या पातळीइतकी असते आणि मधुराणीबरोबर माझी ती संवेदनशीलतेची पातळी खूप छान जुळून आली. तिची आणि माझी मैत्री होण्यापूर्वी मला अशा कविता आवडायच्या ज्या मी नृत्यातून सादर करू शकेन; पण काही कविता या नृत्यातून सादर न करता त्यांचे भाव आपण अनुभवायचे असतात. मधुराणीमुळं मला अशाही कवितांची आवड लागली. ती बहुगुणी आहे. तिच्या व्यक्तिमत्वाला कितीतरी आयाम आहेत. ती सुंदर गाते, निवेदन छान करते, ती कविता करत नसली तरी तिला काव्याची जाण अतिशय उत्तम आहे, अभिनय ती उत्कृष्ट करते. या सगळ्यामध्ये ती अगदी सक्षम आहे. आई कुठं काय करते ही मालिका तिला मिळण्याच्या आधी मला कायम कळकळीनं असं वाटायचं की तिचे कलागुण, तिच्यातलं टॅलेंट अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवं. तितक्यात तिला ती मालिका मिळाली. तिनं ती संधी उत्कृष्ट प्रकारे खांद्यावर पेलत त्या संधीचं सोनं केलं आहे. मला खरोखर तिचा फार अभिमान वाटतो.’’

मधुराणीनं शर्वरीबद्दल वाटणारा आदर आणि प्रेम व्यक्त केलं. ती म्हणाली, ‘शर्वरीचं व्यक्तिमत्त्व अतिशय पारदर्शक आहे. ती माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. मला नेहमी तिच्याशी बोलून, तिचं काम बघून, नृत्य बघून प्रेरणा मिळते. मला मुळातच कोणत्याही कलेची वर्षानुवर्षं साधना करणाऱ्या व्यक्तींबद्दल खूप आदर आहे आणि कथ्थक नृत्याची तिची असलेली आवड, त्यामागची तिची जिद्द, मेहनत, तिचं चिंतन नेहमीच मला प्रेरणा देत असतं. एखाद्या कलेची उपासना कशी करावी यासाठी मला शर्वरी आदर्श वाटते. ती मला माझ्या कामातही नेहमी प्रोत्साहन देत असते. ‘तुझ्यात खूप गुण आहेत. ते लोकांपर्यंत पोहोचू देत, तू मागे राहू नकोस,'' असं ती मला वारंवार सांगत आली आहे. आम्ही एकाच क्षेत्रातल्या असून आमच्यात आतापर्यंत कधीही स्पर्धात्मक विचार आला नाही. ती आज जर अभिनेत्री म्हणून काम करत असती, तर निश्चितच उत्तमोत्तम भूमिका तिच्या वाट्याला आल्या असत्या. पण अभिनयासारखं ग्लॅमर मिळवून देणारं क्षेत्र बाजूला सारून कथकसारख्या अभिजात कलेसाठी स्वतःला वाहून घ्यायला खूप ताकद लागते. एका अभिनेत्रीला जितकी प्रसिद्धी मिळते तितकी प्रसिद्धी एका शास्त्रीय नृत्यांगनेला दरवेळी मिळेलच असं नाही. पण शर्वरीला या कोणत्याही आकर्षणाचा कधीही मोह झाला नाही. मनापासून ती कलेची साधना करत राहिली; हा तिच्यातला भाग मला खूप आवडतो आणि मला तिचा खूप अभिमान आहे, तसंच तिच्याबद्दल प्रेमही आहे. गेले अनेक दिवस आम्हा दोघींच्या कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळं आमच्यात बोलणंही झालं नाही. परंतु तरीसुद्धा आमच्यातलं नातं तितकंच घट्ट आहे.’’

(शब्दांकन - राजसी वैद्य)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: मुंबई, ठाण्यात पहाटेपासून पावसाचा जोर वाढला, राज्यातील 'या' भागांत अलर्ट जारी, पुढील २४ तासांत कसे असेल हवामान?

Jaljeevan Mission: ठेकेदारांची १२ हजार कोटींची देणी द्यावी; जलजीवन मिशन संघटनेची बैठक, अन्यथा आंदोलनचा इशारा

Transport Scam : निरीक्षकावरील कारवाईसाठी अहवालाचा ‘मुहूर्त’, परिवहनमंत्र्यांचा इशारा; आज मुख्यमंत्र्यांकडे पुरावे सादर होणार

Marathi Literature: विसावे समरसता साहित्य संमेलन यंदा नांदेडमध्ये; नियोजन बैठक उत्साहात, नामवंत साहित्यिकांची राहणार उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT