Pramod Prabhulkar esakal
मनोरंजन

Pramod Prabhulkar : 'घटस्फोटाच्या बातम्या निराधार, त्यात तथ्य नाही'!

आई कुठे काय करते या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या मधुराणी प्रभुलकर यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Madhurani Prabhulkar Divorce Aai Kuthe Kay Karte : मराठी टीव्ही मनोरंजन विश्वात ज्या मालिकेनं प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळवली त्या मालिकांमध्ये आई कुठे काय करते, या मालिकेचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. गेल्या काही वर्षांपासून या मालिकेचा टीआरपी हा इतर मराठी मालिकांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. सध्या या मालिकेतील प्रसिद्ध चेहरा मधुराणी प्रभुलकर यांच्याविषयीच्या एका बातमीनं लक्ष वेधून घेतले होते.

आई कुठे काय करते या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या मधुराणी प्रभुलकर यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यांच्या खऱ्या आयुष्यात एक मोठं वादळ आल्याच्या बातम्यांना उधाण आले होते.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

गेल्या काही दिवसांपासून मधुराणी यांच्या वैवाहिक आय़ुष्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. मालिकेमध्ये देखील आपल्या संसाराची वेगळी चूल मांडणाऱ्या मधुराणी यांच्या खऱ्या आयुष्यात देखील वेगळी भूमिका घेतली की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

मात्र दुसरीकडे, यासगळ्या प्रकरणावर मधुराणी यांचे पती प्रमोद प्रभुलकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्या सोशल मीडियावर ज्या घटस्फोटाच्या बातम्या व्हायरल होत आहे त्या अफवा असून त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. आमच्या नात्यामध्ये दुरावा नाही. माध्यमांनी बातमी देताना काळजी घ्यावी. त्यातून विनाकारण बदनामी होणार नाही याची दखल घ्यावी. त्यातून आम्हाला मनस्ताप होतो. असे प्रमोद यांनी म्हटले आहे.

यापूर्वी मधुराणी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अॅक्टिंग अॅकडमीसोबत कार्यरत राहणार नाही. असे स्पष्ट केले होते. कारण ती अॅकडमी त्यांचे पती प्रमोद आणि मधुराणी यांनी सोबत सुरु केली होती. तेव्हापासून त्यांच्यात काही आलबेल नाही. अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT