madhurani prabhulkar from aai kuthe kay karte take big decision of her acting acting academy  SAKAL
मनोरंजन

Madhurani Prabhulkar: यापुढे माझा काही संबंध नसेल... आई कुठे काय करते मधील मधुराणीने घेतला मोठा निर्णय

मधुराणीच्या चाहत्यांना छोटा का होईना धक्का बसलाय

Devendra Jadhav

Madhurani Prabhulkar News: आई कुठे काय करते मधील अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर हिने मोठा निर्णय घेतलाय.

त्यामुळे मधुराणीच्या चाहत्यांना छोटा का होईना धक्का बसलाय. मधुराणीच्या फॅन्ससाठी नक्कीच हि मोठी बातमी आहे.

हे वाचून तुम्हाला वाटलं असेल कि मधुराणीने आई कुठे काय करते मालिका सोडली कि काय तर असं नाहीये. तर काय घडलंय नेमकं, आम्ही सांगतो.

(madhurani prabhulkar from aai kuthe kay karte take big decision of her acting acting academy )

मधुराणीने दिला राजीनामा

मधुराणी तिचा नवरा प्रमोद प्रभुलकर सोबत मिरॅकल्स डान्स अकॅडमी हि अभिनयाची अकॅडमी चालवत असते. आजवर या अभिनय शाळेतून अनेक उत्तमोत्तम कलाकार बाहेर पडले आहेत.

या अभिनय शाळेतून आजवर हृता दुर्गुळे, किरण गायकवाड. शिवानी बावकर असे अनेक कलाकार पुढे आले आहेत. पण आता मधुराणीने या अकॅडमीचा संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.

काय म्हणाली मधुराणी?

मधुराणी लिहिते.. कृपया नोंद घ्यावी. 'मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अँड प्रायव्हेट लिमिटेड ' ही मी आणि प्रमोद ( प्रभुलकर) आम्ही दोघांनी मिळून सुरू केलेली संस्था....

अभिनय प्रशिक्षणाबरोबरच इतरही अनेक कल्पक उपक्रम संस्थेमार्फत आम्ही केले. परंतु माझ्या विविध क्षेत्रातील वाढत जाणाऱ्या व्यस्ततेमुळे संस्थेच्या दैनंदिन कार्यकारिणीत मला लक्ष घालता येत नाही.

तरी समन्वयाने निर्णय घेत मी *संचालक पदाचा राजीनामा* दिलेला आहे. संस्थेशी माझा आता कोणताही संबंध नसेल तरी शुभेच्छा कायम असतीलच. अशी पोस्ट मधुराणीने केलीय.

त्यामुळे एकूणच 'मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अँड प्रायव्हेट लिमिटेड ' सोबत मधुराणीचा काहीही संबंध नसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT