madhuri dixitnews  esakal
मनोरंजन

Tuesday Fitness: माधुरी अजुनही एवढी सुंदर कशी? काय आहे फिटनेसचं सिक्रेट?

वयाची ५० केव्हाच ओलांडलेल्या माधुरीचा जलवा अद्यापही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो.

सकाळ डिजिटल टीम

Madhuri Dixit News: मनोरंजन क्षेत्रामध्ये गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ज्या अभिनेत्रीनं आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे त्या माधुरीच्या सौंदर्याची अजुनही चर्चा होत असते. वयाची ५० केव्हाच ओलांडलेल्या माधुरीचा जलवा अद्यापही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. सोशल मीडियावर देखील माधुरीच्या फिटनेसची चर्चा होत असते. आता माधुरी ५५ वर्षांची आहे.

माधुरीच्या ब्युटीवर चाहते फिदा आहेत. तिचं हसणं, तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि माधुरीचं बोलणं याचे चाहत्यांना नेहमीच अप्रुप असते. चाहते नेहमीच माधुरीला तिच्या फिटनेसविषयी विचारणा करत असतात. यासगळयात माधुरीनं तिच्या फिटनेसविषयी काही खास टीप्स दिल्या आहेत. ज्या आपण जाणून घेणार आहोत. माधुरी गेल्या काही वर्षांपासून टीव्ही मनोरंजन विश्वात अॅक्टिव्ह झाल्याचे दिसून आले आहे. डान्स इंडिया डान्स, झलक दिखलाजा रे सारख्या कार्यक्रमांममधून ती चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

सोशल मीडियावर माधुरीनं तिचं फिटनेस सिक्रेट शेयर केलं आहे. त्यामध्ये ती म्हणते डान्स हेच माझं फिटनेस सिक्रेट आहे. त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. डान्स ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये तुमच्या शरीराला योग्य त्या प्रमाणात व्यायाम मिळतो. त्याची हालचाल होते. म्हणून नृत्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. मी गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ डान्स करते आहे. नव्या लोकांकडून शिकते आहे. डान्स हा माझ्या श्वासाचा एक भाग झाला आहे.

मी आठवड्यातून चार ते पाच दिवस कथ्थक करते. मॉर्निंग वॉकवरही माझा भर असतो. याशिवाय घरातच योगा करुन मी स्वताला फिट ठेवते. आहारातील योग्य बदलही माझ्यासाठी खूपच महत्वाचा आहे. माझे पती डॉक्टर श्रीराम नेने यांच्याकडूनही मला आरोग्याविषयीच्या अनेक महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. असे माधुरीनं एका मुलाखतीतून सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT