Madhuri Dixit Sakal
मनोरंजन

Madhuri Dixit Video: 'घोडे पे सवार' गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित

अभिनेत्रीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यावर चाहते व्हिडिओला प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते. आता माधुरीने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यावर चाहते व्हिडिओला प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत.

माधुरी दीक्षितने इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने आपल्या डान्सने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित कला चित्रपटातील घोडे पे सवार या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे, मात्र आता चाहत्यांचे म्हणणे आहे की, अनुष्कापेक्षा माधुरीने चांगला डान्स केला आहे.

व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित ग्रीन एथनिक आउटफिटमध्ये दिसत आहे. तिने मॅचिंग कलरचे ब्रेसलेट परिधान केले आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. स्माईल आणि लिपसिंकसोबत, माधुरीने घोडे पे सावर या गाण्यावर उत्तम एक्सप्रेशंस देऊन नृत्य केले आहे. सिरीशा भागवतुलाने या गाण्याला तिचा आवाज दिला असून अमिताभ भट्टाचार्य यांनी ते लिहिले आहे, अशी माहिती आहे. संगीत अमित त्रिवेदी यांचे आहे.

डान्सचा व्हिडिओ शेअर करताना माधुरी दीक्षितने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बलमा घोड़े पे क्यों सवार हैं?' या व्हिडिओवर गायिका सिरिशा भागवतुलाने कमेंट केली, 'ओह माय गॉड. द बेस्ट. याशिवाय एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही अनुष्का शर्मापेक्षा चांगला डान्स केला.' 'क्वीन ऑफ रील इज बॅक' अशी टिप्पणी आणखी एकाने केली. आणखी एका युजरने लिहिले की, 'तुम्ही या गाण्यासाठी बनलेले आहात'.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, माधुरी दीक्षित शेवटचा मजा मा या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने गजराज राव, ऋत्विक भौमिक आणि बरखा सिंह यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट गेल्या वर्षी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Raj Thackeray: ''2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं..'' राज ठाकरेंचा चिमटा; दोन्ही ठाकरेंसह मुख्यमंत्री एकाच मंचावर

Pune Theft : मार्केटयार्डात डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT