Madhuri Dixit esakal
मनोरंजन

Madhuri Dixit: "दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ..."; मराठी गाण्यावर धकधक गर्लचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

Madhuri Dixit: नुकताच माधुरीनं एका मराठी गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

priyanka kulkarni

Madhuri Dixit: अभिनेत्री माधुरी दीक्षितनं (Madhuri Dixit) बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. माधुरी ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. माधुरी सोशल मीडियावर तिच्या विविध लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. नुकताच माधुरीनं एका मराठी गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

माधुरीचा जबरदस्त डान्स

माधुरी दीक्षितनं "गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ..." या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी ही खास लूकमध्ये दिसत आहे. डोळ्यावर गॉगल, मोकळे केस आणि लाल ड्रेस अशा लूकमध्ये माधुरी दिसत आहे. या व्हिडीओला माधुरीनं कॅप्शन दिलं, "राजा फोटो माझा काढ".

पाहा व्हिडीओ:

गाणं सोशल मीडियावर होतंय ट्रेंड

"गुलाबी साडी आणि लाली लाल लाल" हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. अनेक जण या गाण्यावरील रिल्स सोशल मीडियावर शेअर करत आहेत. गायक संजू राठोडचं हे गाणं युट्यूबवरील 55 टॉप म्युझिक व्हिडीओमध्ये ट्रेंड होत आहे. संजू राठोडच्या नऊवारी साडी पाहिजे या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्याचे गुलाबी साडी हे गाणं रिलीज होऊन एक महिना झाला आहे. आतापर्यंत या गाण्याला 9,938,382 व्ह्यूज मिळाले आहेत.

माधुरीचे चित्रपट

माधुरीचा पंचक हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. या सिनेमाची माधुरीनं निर्मिती केली. माधुरी ही सध्या डांस दीवाने या कार्यक्रमाचं परीक्षण करत आहे. सुनील शेट्टी देखील या कार्यक्रमाचं परीक्षण करतो. हम आपके है कौन!, तेजाब,साजन, बेटा,दिल तो पागल है,डेढ इश्किया या चित्रपटातील माधुरीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. द फेम गेम या वेब सीरिजमधून देखील माधुरी प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता माधुरीचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: ५ दिवस... ४५,००० कोटी रुपयांची कमाई, 'या' कंपनीने दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना दिला सर्वाधिक फायदा

CM Devendra Fadnavis: युतीतील घटक पक्षांवर टीका टाळा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; साताऱ्यातील दोन्ही आघाडीबाबत नेमकं काय म्हणाले?

आलू से सोना तो नहीं बनाते, शेतकऱ्याची मिश्किल टिप्पणी; PM मोदी म्हणाले, हे जैनांसाठी...

Bhaubeej 2025 Date: 22 कि 23 ऑक्टोबर कधी आहे भाऊबीज? वाचा एका क्लिकवर शुभ मुहूर्त अन् तारिख

Latest Marathi News Live Update : शाळा आणि महाविद्यालयाच्या मैदानात RSSचे कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देऊ नये - मंत्री प्रियांक खर्गे

SCROLL FOR NEXT