madhuri dixit instagram
मनोरंजन

माधुरी दीक्षितच्या मुलाकडून कॅन्सर पीडितांसाठी मोलाचं काम; नेटकऱ्यांकडून कौतुक

मला माझ्या मुलावर अभिमान आहे, असं माधुरीने लिहिलं.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती तिच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी पोस्ट करत असते. नुकतंच तिने तिच्या मुलाचा म्हणजे रायनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात तो त्याचे केशदान करताना दिसत आहे. कर्करोग दिनाचं औचित्य साधून रायनने कॅन्सर पीडितांसाठी केशदान करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून खूप कौतुक होत आहे.

माधुरीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं, 'राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त मी एक खास गोष्ट शेअर करत आहे. रायनने काही कॅन्सर पीडित लोकांना पाहिलं आणि त्यांना पाहून त्याला खूप वाईट वाटलं. कॅन्सर पीडित अत्यंत कठीण काळाचा सामना करतात, उपचारादरम्यान त्यांचे केस गळू लागतात आणि ते पाहूनच माझ्या मुलाने कॅन्सर सोसायटीला केशदान करण्याचं ठरवलं आहे.' तिने पुढे लिहिलं, 'रायनला आवश्यक तेवढे केस वाढण्यासाठी जवळपास २ वर्षे लागली. आज आम्हा दोघांनाही त्याचा अभिमान आहे.' या पोस्टमध्ये तिने पती डॉ. नेने यांनाही टॅग केलं आहे.

माधुरीने व्हिडीओ पोस्ट करताच त्यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. एकाने लिहिलं, 'तुम्ही तुमच्या मुलाला खूप चांगले संस्कार दिले आहेत आणि आम्हालाही त्याचा अभिमान वाटतोय.' जिनिलिया डिसूझा देशमुख, दिया मिर्झा, प्रार्थना बेहरे, फराह खान यांसारख्या सेलिब्रिटींनीही रायनचं कौतुक केलं.

माधुरी करण जोहरच्या 'कलंक' या चित्रपटात दिसली होती. ती लवकरच संजय कपूर आणि मानव कौल यांच्यासोबत ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग... एसटी पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले होणार! सुविधा कुठे उपलब्ध असणार?

Vegetable Vendor Wins 11 crore Lottery Video : नशीब असावं तर असं! मित्राच्या पैशाने लॉटरीचं तिकीट खरेदी केलेल्या भाजी विक्रेत्याने जिंकलं तब्बल ११ कोटींचं बक्षीस

Uddhav Thackeray : सरकारने दिलेले पॅकेज ही शेतकऱ्याची थट्टा- उद्धव ठाकरे!

Autism Success Story: आईच्या साथीनं आणि जिद्दीनं बदललं आयुष्य! ऑटिझमवर मात करून 'सोहम'ने घडवली स्वतःची ओळख

Marathi Rangabhoomi : मराठी रंगभूमी दिन अमेरिकेत साजरा! 'गढीवरच्या पोरी' नाटकाने सॅन फ्रान्सिस्कोतील नवीन ब्लॅकबॉक्स थिएटरचा प्रारंभ

SCROLL FOR NEXT