Madhuri Dixit share photo with apple ceo Tim Cook eating Vada Pav In Mumbai standup comedian Tanmay Bhat reacts
Madhuri Dixit share photo with apple ceo Tim Cook eating Vada Pav In Mumbai standup comedian Tanmay Bhat reacts  
मनोरंजन

Tim Cook News : कूक कूक कूक…; माधुरीनं घेतली अ‍ॅपलच्या सीईओची भेट, रंगली वडापाव पार्टी

रोहित कणसे

मुंबई : जगप्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक त्यांच्या कंपनीच्या स्टोअर लाँचसाठी मुंबईत आले आहेत. त्यांच्या मुंबई भेटीदरम्यान कूक यांनी बॉलिवुड अभिनेत्री माधुरी दिक्षीत सोबत मुंबईचा फेमस वडापावचा आनंद घेतला. (Madhuri Dixit share photo with apple ceo Tim Cook eating Vada Pav In Mumbai )

माधुरीने तिच्या ट्विटर अकाउंटवरून या भेटीचा फोटो ट्वीट केला आहे. मुंबईत वडापावपेक्षा उत्तम स्वागत कशाने केलं जाऊ शकतं असं कॅप्शन माधुरीने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये दोघे वडापाव हातात घेऊन मोठ्याने हसताना दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन तन्मय भट्टने माधुरी आणि टीम कुक यांचा फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन दिलं आहे. हे घडत असताना जर कोणी कूक कूक कूक... गात नसेल तर मग कशालाच काही अर्थ नाही असे तन्मय म्हणाला आहे. या ट्वीटवर देखील नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट पाहायला मिळत आहेत.

आयफोन बनवणाऱ्या अॅपल या मोबाईल कंपनीचे सीईओ टीम कूक हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी रात्री त्यांचं मुंबईत आगमन झालं, कुलाब्यातील हॉटेल ताल पॅलेसमध्ये कूक यांचा मुक्काम असणार आहे. तत्पूर्वी कूक यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांची घरी भेट दिली. यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतील असं सांगितलं जात आहे.

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये अॅपलच्या भारतातील पहिल्या स्टोअरचं उद्घाटन होणार आहे. १८ एप्रिलपासून अॅपलचं हे आऊटलेट ग्राहकांसाठी खुलं होणार आहे. त्यानंतर नवी दिल्लीतील साकेत भागात लवकरच अॅपलं दुसरं स्टोअर सुरु होणार आहे. स्वतः अॅपलचे सीईओ टीम कूक यांच्या हस्ते या स्टोअर्सचे उद्घाटनं होणार आहेत. यावेळी कूक पंतप्रधान मोदींची भेट घेऊ शकतात.


ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातल्या शिक्षक, पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या; निवडणूक आयोगाचा निर्णय

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्स 340 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Samir Choughule: "तुझ्या विना माझे सतत..."; बायकोच्या वाढदिवसानिमत्त समीर चौघुलेंची खास पोस्ट

Delhi Liquor Scam: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 'आप' पक्षही आरोपी, ईडीची हायकोर्टात माहिती

Marathi News Live Update: "केंद्र सरकार लोकतंत्र नव्हे 'धनतंत्र' चालवत आहे", जयराम रमेश यांची टीका

SCROLL FOR NEXT