Akhil Bhartiya marathi chitrapat mahamandal  esakal
मनोरंजन

Madhuri Dixit : माधुरी, जॉन अब्राहम, प्राजक्ता माळीचं नावच यादीतून वगळले! अडीच हजार कलाकारांची नावं गायब

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीच्या यादीतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Madhuri Dixit to Mahesh Tilekar Akhil Bhartiya marathi chitrapat mahamandal : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीच्या यादीतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणूक यादीतील चक्क अडीच हजारांहून अधिक कलाकारांची नावचं वगळल्याची बाब पुढे आली आहे. त्यामध्ये बॉलीवूडच्या तारे -तारकांचाही समावेश आहे.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. मात्र त्या यादीतून बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित, डॉ. श्रीराम नेने, जॉन अब्राहम ,प्राजक्ता माळी ,महेश टिळेकर ,तुषार दळवी ,लोकेश गुप्ते यांच्यासह अडीच हजार कलाकारांचे नाव भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणूक यादीतून वगळले असल्याचा आरोप सलाम पुणे संघटनेचे अध्यक्ष  शरद लोणकर यांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना लोणकर म्हणाले की, अडीच हजार मतदारांची नावे नियमबाह्य ठरवून ती काढून टाकण्यात आली. ज्या सभासदांनी वर्गण्या भरल्या ,पावती घेतल्या ओळखपत्रेही मिळविली, त्या सभासदांना मतदानाच्या हक्कापासून दूर ठेवण्यात येत आहे. तसेच अनेकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही अशी स्थिती निर्माण करून ठेवल्याचे दिसून आले आहे. ही एकप्रकारे फसवणूकच आहे.

यादीतून माधुरी शंकर दीक्षित (सभासद क्रमांक -३४०६३), श्रीराम माधव नेने (सभासद क्रमांक -३४०६४ ),जॉन अब्राहम (सभासद क्रमांक ३०१४१ ),प्राजक्ता ज्ञानेश्वर माळी (सभासद क्रमांक २८५७४ ),तुषार दळवी (सभासद क्रमांक ३३९५१०),महेश टिळेकर (सभासद क्रमांक २७३१०) , मराठी तारका प्रोडक्शन (सभासद क्रमांक २७३१२ ) यांच्यासह अने मान्यवरांचाही समावेश असल्याचे प्रथम जाहीर झालेली मतदारांची कच्ची यादी आणि काल जाहीर झालेली मतदारांची अंतिम यादी पाहता स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे सभासदांच्या नावांना कार्यकारिणीची बैठक घेऊन मंजुरी द्यायला हवी होती ती ४ वर्षात दिली गेली नाही,त्यामुळे हि नावे वगळून टाकण्यात येत असल्याचे निवडणूक अधिकारी यांनी म्हटले आहे. ज्या महामंडळाचे प्रत्यक्षात अ आणि ब वर्गातील असे मिळून  सुमारे  ४० हजार सभासद असल्याच्या चर्चा झडत होत्या, त्या महामंडळाच्या निवडणुकीत आता केवळ ३ हजार ४००  मतदार उरल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच ब वर्गातील सभासदत्व सलग ३ वर्षे पूर्ण झाल्यावर अ वर्ग प्राप्त होऊन तो सभासद मतदार होतो असे सव्वासहा हजार मतदारांची नावे असलेली कच्ची मतदार यादी यापूर्वी निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केली होती. निवडणूक अधिकारी यांच्या या निर्णयावरून मोठा गदारोळ झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT