madhuri dixit son birthday 
मनोरंजन

मुलाचा 18 वा बर्थडे; माधुरीने शुभेच्छा देत म्हटलं,'लक्षात ठेव...'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलिवूडची धकधक गर्ल माधूरी दिक्षीत सोशल मीडियावर अपडेट असते. आजही तिच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. तिच्या आदाकारिने आणि नृत्याने ती नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकते. माधूरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तिच्या आयुष्यातील खास क्षण नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते. 

नुकताच माधुरीने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. माधुरीने तिचा मुलगा आरिनसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये आरिन लहान असतानाचा एक  फोटो आणि आत्ताचा एक फोटो असे दोन फोटो माधुरीने शेअर केले आहेत. 

माधुरीने असे कॅप्शन दिले की, 'माझं बाळ प्रौढ झालं, 18 व्या वाढदिवसाच्या हार्धिक शुभेच्छा आरिन, एक लक्षात ठेव की स्वातंत्र्यासोबतच जबाबदाऱ्यासुद्धा असतात. आजपासून जग तुझं आहे. आनंदी रहा, तुझ भविष्य उज्वल आणि सुरक्षित होवो.' तुला मिळणाऱ्या सर्व संधींचे सोने कर आणि आयुष्याचा पूर्ण आनंद घेऊन जग. आशा आहे की तुझं आयुष्य अविस्मरणीय असं असेल. लव्ह यू'

माधुरीच्या अनेक चाहत्यांनी या फोटोला कमेंट करून आरिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी माधुरीने तिच्या आईचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती मराठीमध्ये बोलताना दिसली. माधुरी आणि श्रीराम नेने यांचे लग्न 17 ऑक्टोबर 1999 रोजी झाले. त्यानंतर त्यांना 17 मार्च 2003 रोजी आरिन नावाचा मुलगा झाला. अरिन 18 वर्षाचा झाल्याने आता त्याने जबाबदार व्यक्तीसारखे वागणे गरजेचे आहे असा संदेश माधुरीने आरिनच्या वाढदिवसानिमित्त दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : मेरठमधील 'ब्लू ड्रम' हत्याकांडात पत्नी मुस्कान आणि तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT