Pathaan Shah Rukh Khan  esakal
मनोरंजन

Pathaan: आता दिपिकाच्या भगव्या बिकिनीचा वाद थेट पैगंबरांपर्यंत...

सकाळ डिजिटल टीम

सध्या सोशल मिडियावर एकचं विषयाची चर्चा रंगली आहे. ती म्हणजे शाहरुख अन् दिपिकाच्या पठाणं या चित्रपटाची आणि त्या गाण्यातल्या बिकिनीची... गेल्या काही दिवसांपासून ह्या चित्रपटाचा वाद काही थांबण्याचं नावं घेत नाही आहे.

अनेक कलाकार, नेतेमंडळींपासून सर्व सामान्य माणसापर्यंत सागळ्यांनीच यावर आपली प्रतिक्रिया दिली. काही याच समर्थन केलं तर काहीनीं कडाडून विरोध केला. अनेक हिंदू संघटनांबरोबरचं मुस्लिम संघटनांनीही चित्रपट प्रदर्शित करु देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

त्यातच राजकिय पातळीवरही याप्रकरणात चांगलाच विरोध हेतं आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यानंतर आता राज्याचे विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम यांनीही अभिनेता शाहरुख खानच्या आगामी ‘पठान’ चित्रपटाला विरोध केला आहे.

ते म्हणाले, "शाहरुखने आपल्या मुलीसोबत हा चित्रपट पाहावा, एक फोटो अपलोड करावा आणि जगाला सांगावं की तो आपल्या मुलीसोबत हा चित्रपट पाहत आहे. मी तुम्हाला पैगंबरावर असाच चित्रपट बनवून तो चालवण्याचं आव्हान देतो. ."

चित्रपटगृहांमध्ये 'पठाण'वर बंदी घालण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आजपासून सुरू होणाऱ्या पाच दिवसीय हिवाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्ष गौतम यांनी ही माहिती दिली.

विरोधी पक्षनेते डॉ गोविंद सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही हा चित्रपट ‘आमच्या मूल्यांच्या विरुद्ध’ असल्याचं सांगत त्याला विरोध केला आहे. सुरेश पचौरी म्हणाले, "हे पठाणांबद्दल नाही, तर कपडे परिधान करण्याबद्दल आहे.भारतीय संस्कृतीत, कोणत्याही स्त्रीला असे कपडे घालण्याची आणि सार्वजनिक ठिकाणी ते दृश्य प्रदर्शित करण्याची परवानगी नाही, मग ती हिंदू, मुस्लिम किंवा अनुयायी असो."

बुधवारी नरोत्तम मिश्रा यांनी चित्रपटातील एका गाण्यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले होते, "गाण्यातील वेशभूषा आक्षेपार्ह आहेत. गाण्यात घाणेरडी मानसिकता दिसून येते." पठाण'च्या निर्मात्यांनी 'बेशरम रंग' हे गाणे रिलीज केल्यानंतर दोन दिवसांनी नरोत्तम मिश्रा यांचे वक्तव्य आले आहे. त्यामूळे आता पठाणचा वाद आणखीणचं चिघळणार असल्याचं दिसतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT