Madras High Court summons actor Dhanush Google
मनोरंजन

धनुषला मद्रास High Court चे समन्स, 5 वर्ष जुनं बायलॉजिकल आई-वडील प्रकरण

एका दाम्पत्यानं दावा केला होता की धनुष त्यांचा मुलगा आहे त्या केससंदर्भात हे समन्स पाठवण्यात आलं आहे.

प्रणाली मोरे

दाक्षिणात्य अभिनेता धनुषच्या(Dhanush) विरोधात मद्रास हाय कोर्टांनं(Madras High Court) समन्स जारी केलं आहे. एका कपलनं दावा केला होता की धनुष त्यांचा मुलगा आहे त्या केस संदर्भात हे समन्स पाठवण्यात आलं आहे. ही केस जवळपास गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. आता या केस संदर्भात कोर्टांन धनुषला समन्स पाठवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे की,धनुषला मुलगा म्हणवणाऱ्या कपलचं नाव कथिरेसन आणि त्याच्या पत्नीचं नाव मिनाक्षी आहे. त्यांचा आरोप आहे की,प्रसिद्ध अभिनेता धनुष त्यांचा मुलगा आहे. तो खूप वर्षापूर्वी अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी घर सोडून चेन्नईला गेला होता.

कथिरेसननं कोर्टात दावा केला आहे की,धनुषने पॅटर्निटी टेस्ट (पितृत्व परिक्षण)संदर्भातले कागदपत्र जमा केले आहेत. अभिनेता धनुषचा स्वत: ला पिता म्हणवून घेणाऱ्या कथिरेसन यांने यासंबंधी पोलिस तपासणी करण्याची मागणी केली आहे. त्यानं कोर्टात अपील केलं आहे की ही टेस्ट खोटी आहे आणि दोन वर्षापूर्वी दिलेल्या आदेशाला रद्द केलं जावं.

या अपीलनंतर कोर्टानं धनुषच्या विरोधात नोटीस जारी केली आहे. धनुषला स्वतःचा मुलगा म्हणवणाऱ्या या दाम्पत्यानं अपील करताना दावा केला आहे की धनुष त्यांचा तिसरा मुलगा आहे. तो इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी घर सोडून गेला होता. धनुषला आपला मुलगा म्हणवणाऱ्या या दाम्पत्यानं प्रत्येक महिन्याला धनुषकडून ६५ हजार रुपये मिळावेत अशी मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार,धनुषनं या सगळ्या आरोपांचं खंडन केलं आहे. खरंतर,धनुष २०१७ मध्ये ही केस जिंकला होता. पण आता पुन्हा या दाम्पत्यानं या केसमध्ये पोलिस तपासाची मागणी केली असल्यानं केस पुन्हा सुरू ओपन झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Ceasefire Deal: 'होर्मुज'मध्ये शांतता आणि इराणसाठी 300 अब्ज डॉलरची गुंतवणूक; अमेरिका-इराणमध्ये शांतता कराराचा नवीन मसुदा

CIDCO: सिडकोची भरती आणखी लांबणीवर, नवी तारीख होणार जारी; अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

GT vs RR Qualifier 2: टॉसच्या वेळी 'गोंधळ' झाला... सामन्यापूर्वीच वाद रंगला; दोनवेळा झाली नाणेफेक अन्... नेमकं काय घडलं?

Parner Crime : पारनेरमध्ये दुसरा भोंदू बाबा! 'काळुबाईची बाधा' घालवण्याच्या बहाण्याने साडे सहा लाखांची फसवणूक व महिलेवर अत्याचार

Hadapsar News : हडपसरमध्ये गावठी दारूचे थैमान, पाच जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT