Sheryln Chopra 
मनोरंजन

शर्लिन चोप्राचे अश्लील चित्रीकरण करणाऱ्या दोघांना अटक

अनिश पाटील

मुंबई : मॉडेल शर्लिन चोप्राचा अश्लील चित्रफीत अपलोड करणाऱ्या क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि व्हिडिओग्राफरला महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली. मीता झुनझुनवाला आणि राजू दुबे या दोघांना बुधवारी याप्रकरणी अटक करण्यात आली. ते यापूर्वी एका अभिनेत्रीच्या पतीच्या मालकीच्या मोबाईल अॅप्लिकेशन कंपनीत काम करत होते. पण सध्या त्याचा कंपनीशी संबंध नसल्याचे सूत्रांनी सांगितले. शर्लिन चोप्राचा अश्लील व्हिडीओ बनवून त्यानंतर तो व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड करण्यात आला होता. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलच्या रुममध्ये त्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. शर्लिन चोप्राही याप्रकरणातील एक आरोपी आहे. पण तिने याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतल्यानंतर तिला अटकेपासून तुर्तास संरक्षण मिळाले आहे.

अश्लीलता पसरवल्याच्या आरोपाखाली राज्य सायबर पोलिसांनी 25 ओटीटी प्लॅटफॉर्मविरोधात गेल्या वर्षी 6 नोव्हेंबर रोजी  गुन्हा दाखल केला होता.  त्यात हॉटशॉट्स, फ्लीजमुव्हीज, फेनेओ, कुक्कू, निओफ्लीक्स, उल्लू, हॉटमस्ती, चिक्कूफ्लीक्स, अल्ट बालाजी आणि कुक्कू यांच्यासह दोन पॉर्न संकेतस्थळांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मसह कलाकार, क्रू मेंबर, प्रॉडक्शन हाऊस, दिग्दर्शक आणि निर्माता यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्धनग्न, लैंगिक पिळवणूक व अश्लील दृश्य दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर यातील दृश्य पॉर्न संकेतस्थळांवरही अपलोड करण्यात आली आहेत. सध्या असे प्रकार वाढल्यामुळे अनेक तक्रारी येत होत्या. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. एका ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. या नागरिकाने  पालघर येथे महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ ऑनलाईन विकण्यात आल्याप्रकरणी एकाला अटक झाल्याचे वृत्त वाचले होते. त्यामुळे अनेक तरूणींचे जीवन उद्धवस्त केले जात आहे. त्यानंतर या नागरीकाने ई-मेलद्वारे याप्रकरणी पॉर्नसाईट व काही ओटीटी प्लॅटफॉर्मविरोधात तक्रार केली होती. भादंवि कलम 292 , माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम  67,  67(A) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संपादन- स्वाती वेमूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT