mahadev app case ranbir kapoor sonakshi sinha shraddha kapoor bharti singh on ed radar  SAKAL
मनोरंजन

Mahadev App Case: केवळ रणबीर कपूरच नाही तर सोनाक्षी सिन्हापासून श्रद्धा कपूरपर्यंत बॉलिवूड कलाकार ईडीच्या रडारवर

सोनाक्षी सिन्हा, श्रद्धा कपूर पर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार इडीच्या रडारवर आहेत

Devendra Jadhav

Mahadev App Case News: महादेव अॅपचं प्रकरण सध्या चांगलंच वाढणार असल्याचं दिसतंय. महादेव अॅप मुळे अनेक कलाकार ईडीच्या रडारवर आहेत. काल रणबीर कपूरला ईडीनं समन्स बजावलंय.

आता नवीन माहितीनुसार, केवळ रणबीर कपूर नाही तर बॉलिवूडचे अनेक कलाकार या अॅप प्रकरणाच ईडीच्या रडारवर आहेत.

अभिनेता रणबीर कपूरनंतर अनेक प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार आणि गायक ईडीच्या रडारवर अनेक सेलिब्रिटींनी महादेव बुक अॅपची जाहिरात केल्याच उघड झालंय

रणबीर कपूर सोबकच कलाकार अमिषा पटेल, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, इम्रान हाश्मी, बोमन इराणी, कॉमेडियन भारती सिंग आणि इतर गायकांसह महादेव अॅपची जाहिरात करणाऱ्या कलाकार आणि गायकांचे व्हिडिओ समोर

महादेव बुक अॅपची जाहिरात आणि प्रमोशन करणाऱ्या या अनेक कलाकार आणि गायकांना मोठी रक्कम मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे हे कलाकार ईडीच्या रडारवर आहेत

महादेव गेमिंग अॅप काय आहे?

महादेव गेमिंग अॅप हे पोकर, कार्ड गेम, चान्स गेम्स, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल यांसारख्या वेगवेगळ्या खेळांमध्ये बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी प्रोत्साहन देते. तसेच क्रिकेटवर सट्टेबाजीसाठी व्यासपीठ प्रदान करतेय याशिवाय तीन पट्टी सारखे अनेक पत्ते खेळ खेळण्याची तरतूद करते.

महादेव अॅपची देखभाल करणारे लोक विविध इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अनेक छुपे गट चालवतात. या अॅपच्या माध्यमातून दररोज ₹ 200 कोटींचा नफा होण्याची शक्यता आहे.

महादेव अॅपचे अडचणीत कधी सापडलं?

छत्तीसगडच्या भिलाई येथील सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे महादेव अॅपचे मुख्य फाऊंडर आहेत. हे दोघे दुबईमधून त्यांचे ऑपरेशन चालवत आहेत.

हे अॅप अनेक पॅनलद्वारे चालवले जाते. चंद्रकर आणि उप्पल हे दोघे छोट्या फ्रँचायझीप्रमाणे इतर ठिकाणी हे विकतात.

महादेव अॅपच्या माध्यमातून एकतर फसव्या पद्धतीने अकाऊंट उघडली जातात किंवा कमिशनसाठी कर्ज दिले जातात.

काही आठवड्यांपूर्वी अशी बातमी आली होती की, चंद्राकरने दुबईत त्याच्या लग्नात ₹ 200 कोटी खर्च केले होते. लग्नासाठी नागपूरहून दुबईला जाण्यासाठी त्याने आपले कुटुंब आणि मित्रमंडळींना घेऊन जाण्यासाठी खाजगी विमान भाड्याने घेतले होते. त्यामुळे ईडीची नजर सौरभ आणि या अॅपचे प्रमोशन करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांवर गेली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT