Mahadev Book App Main Accused Mumbai  esakal
मनोरंजन

Mahadev Betting App : 'महादेव बेटींग अ‍ॅप' प्रकरणातील मुख्य सुत्रधार पोलिसांच्या जाळ्यात

आता महादेव अॅप प्रकरणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Mahadev Book App Main Accused Mumbai : बॉलीवूड विश्वाला मोठा धक्का त्या महादेव बूक अॅप प्रकरणानं बसला होता. त्यातून अनेक सेलिब्रेटींची नावं समोर आली होती. त्यात रणबीर कपूर पासून नेहा कक्कर या सेलिब्रेटींचा समावेश होता. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांचे नाव देखील एका अॅपमुळे चर्चेत आले होते.

आता महादेव अॅप प्रकरणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या अॅप प्रकरणातील मुख्य सूत्रधार मृगांक मिश्रा याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मिश्रावर 1630 बनावट खात्यांद्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मिश्रा रतलामचा रहिवासी असून दुबईत बसला लपून बसल्याची बातमी समोर आली होती.

Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

इमिग्रेशन विभागाने त्याला पकडून राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिले. यापूर्वी महादेव बुक अ‍ॅप प्रकरणी अनेक बॉलिवूड अभिनेत्यांना ईडीने समन्स दिलं होतं. त्यातच आता विनोदी कलाकार कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि हिना खान यांनी ईडीने समन्स बजावलं.

महादेव बुक या अ‍ॅपची जाहिरात करणारे कलाकार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच महादेव अ‍ॅपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्या दुबईमध्ये पार पडलेल्या अलिशान लग्न सोहळ्यात सादरीकरण करणाऱ्या सेलिब्रेटिंना आर्थिक मोबदला मिळाल्याचा ईडीला संशय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : उल्हासनगरहून विजय मेळाव्यासाठी कार्यकर्ते रवाना

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT