mahaepisodes on zee yuva esakal news 
मनोरंजन

'फुलपाखरू', 'लव्ह लग्न', लोच्या' आणि 'अंजली' या मालिकांचे महाएपिसोड लवकरच

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पाऊस कधी रिमझिम, कधी मुसळधार तर कधी अचानक धुंद बरसतो ,  ओला हळवा पाऊस अतिशय प्रेमाने  तुम्हाला अलगदपणे कवेत घेतो. मुळात हा ऋतूच  प्रेमात पाडणारा आहे . सुंदर निसर्गात मंत्रमुग्धपणे  भिजल्यावर , गरम गरम चहा, कांदा भजी . सोबतीला एखादं रोमँटिक गाणं ही अपेक्षा प्रत्येकाची असते. आपल्या प्रेक्षकांचा मान्सूनचा हाच आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपल्या मालिकांच्या महाएपिसोडस चा मान्सून धमाका घेऊन येत आहे .  झी युवावर येत्या ९ जुलैला महाएपिसोडचा "युवावार" साजरा होणार आहे.

झी युवा आणि झी टॉकीज चे बिझिनेस हेड 'बवेश जानवलेकर' यांनी महाएपिसोडच्या निमित्ताने सांगितले की “ पहिली भेट, पहिली डेट आणि पहिलं प्रपोज ही थीम घेऊन झी युवा प्रेक्षकांसाठी  'अंजली', 'फुलपाखरू'आणि 'लव्ह लग्न लोचा' या तिन्ही मालिकांचे महाएपिसोडची पर्वणी घेऊन येत आहे. झी युवा  नेहमीच प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट कार्यक्रम घेऊन येत असते . सध्या प्रेक्षक मान्सून ची मजा अनुभूवत असताना  हा एक वेगळा प्रयोग आम्ही करत आहोत . प्रेक्षकांचं आमच्यावरील प्रेम वाढत राहो अशी आमची इच्छा आहे . “

डॉक्टरांच्या आयुष्यावर आधारित 'अंजली' या मालिकेत एका नवीन डॉक्टरची एंट्री होणार आहे. डॉक्टर असीम म्हणजेच पियुष रानडे हे एक नवीन पात्र मालिकेत दाखल होत आहे .डॉक्टर असीम आणि अंजली यांची एका कॅम्पच्या निमित्ताने पहिल्यांदाच भेट होणार असून असीमच्या येण्याने अंजलीच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलाची सुरुवात या महाएपिसोडमधून होणार आहे. हा महाएपिसोड रविवार ९ जुलै रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता झी युवावर पहायला मिळेल.

टीनएज लव्हस्टोरी असलेल्या 'फुलपाखरू' या मालिकेत मानस आणि वैदेही यांच्यातला अबोला अखेर संपला असून चांगल्या मैत्रीला सुरुवात झाली आहे. या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल का आणि कधी याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. गेल्या काही महिन्यांच्या मैत्रीनंतर मानस आणि वैदेही अखेर पहिल्यांदा डेटवर जाणार आहेत. इथे नेमकं काय घडेल? मानस आणि वैदेही आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करतील का? हे या महाएपिसोडमध्ये उलगडेल.हा महाएपिसोड रविवार ९ जुलै रोजी दुपारी १  आणि संध्याकाळी ८ वाजता झी युवावर पहायला मिळेल.

प्रेम, लग्न आणि त्यामुळे होणारे लोचे यासाठी प्रसिद्ध असलेल्या 'लव्ह लग्न लोचा' मालिकेत राघवच्या आयुष्यात बदल घडणार असून त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार आहे. प्रेम म्हणजे टाईमपास असा समज असलेला राघव आता खऱ्या प्रेमात पडला असून काव्याला प्रपोज करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. एका खास क्षणी राघव त्याचं प्रेम काव्याकडे व्यक्त करणार आहे.हा महाएपिसोड रविवार ९ जुलै रोजी दुपारी २ आणि संध्याकाळी ९ वाजता झी युवावर पहायला मिळेल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT