Maharashtra Din special story sanyukt maharashtra movement shahir artist contribution shahir amar shaikh anna bhau sathe atmaram patil
Maharashtra Din special story sanyukt maharashtra movement shahir artist contribution shahir amar shaikh anna bhau sathe atmaram patil sakal
मनोरंजन

Maharashtra Din: 'त्या'वेळी शाहीरांचा डफ कडाडला आणि महाराष्ट्र रातोरात पेटून उठला..

नीलेश अडसूळ

Maharashtra Din: महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे १ मे १९६० चा दिवस. या दिवशी महाराष्ट्र स्वतंत्र होऊन मुंबईसह 'संयुक्त महाराष्ट्र' झाला. त्या दिवसांपासून आपण महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत.

आज ६३ वा महाराष्ट्र दिन आहे. सर्वत्र जय जय महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा.. असा जयघोष घुमत आहे. पण हा विजय इतका सहज शक्य नव्हता. या लढ्यात अनेकांच्या प्राणांची बाजी लागली.

जवळपास चार वर्षांहून अधिक काळ तीव्र लढा सुरू होता. या संग्रामात १०६ हुताम्यांचे बलिदान गेले. तर अनेकांचे रक्त सांडून हा महाराष्ट्र घडला आहे. या लढ्यात अनेक कामगार, कलाकार, लेखक, साहित्यिकही सहभागी झाले होते. पण त्यात विशेष योगदान ठरले ते शाहीरांचे..

शाहीरांनी आपल्या लेखनीने आणि कवणाने रस्त्या रस्त्यावर उभं राहून महाराष्ट्र पेटवला. अशी गीतं रचली की त्यातून महाराष्ट्राला फोडू पाहणाऱ्या नेत्यांवर घणाघाती हल्ले झाले. घराघरात बसलेल्या लोकांना रस्त्यावर आणून या संग्रामात सामील करून घेण्यात शाहीरांचा मोठा वाटा आहे. त्याचाच आज थोडक्यात आढावा घेऊया..

(Maharashtra Din special story sanyukt maharashtra movement shahir artist contribution shahir amar shaikh anna bhau sathe atmaram patil)

संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात विचारवंतांबरोबर शाहीरही सहभागी झाले होते. किंबहुना सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सामावून घेण्याचं महत्त्वाचं कार्य शाहिरांच्या पोवाड्यांनी केलं.

शाहीर हे केवळ शाहीर नव्हते तर तत्कालीन राजकीय आणि सामाजिक स्थितीचे भाष्यकारही होते. ते या लढ्यातील बिनीचे शिलेदार होते. कॉ. डांगे, आचार्य अत्रे, सेनापती बापट, एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब गायकवाड यांसारख्या नेत्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यात शाहिरांची महत्वाची भूमिका होती.

'जागा मराठा आम जमाना बदलेगा' अशी डरकाळी फोडणाऱ्या शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा तेवत ठेवला. 'वन्ही तो चेतवावा, चेतविताचि चेततो' या समर्थ रामदासांच्या वचनाप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राचा वन्ही जसा नेत्यांनी चेतविला, तसाच तो शाहिरांनी आपल्या वाणीतून आणि हातातील डफातून सतत पेटता ठेवला.

शाहीर अमरशेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर जंगम स्वामी, शाहीर गजाभाऊ बेणी, शाहीर नामेदव कापडे, शेख जैनू चांद, कृष्णकांत जाधव, शाहीर चंदू भरडकर, केशर जैनू चांद, इंदायणी पाटील, बी. नीलप्रभा हे आणि असे अनेक ज्ञात आणि अज्ञात शाहीर, महिला कलावंत संयुक्त महाराष्ट्राच्या महामंथनाचे केवळ भाष्यकार नव्हे तर शिलेदार ठरले.

शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे सहकारी शाहीर अमरशेख आणि शाहीर गवाणकर यांच्या लाल बावटा कलापथकाने अवघा महाराष्ट्र घुसळून टाकला होता. शाहीर अमरशेख यांच्या या कवनाने संयुक्त महाराष्ट्राच्या सभेतील वातावरणच बदलून जाई. शिवाजी पार्क, नायगाव, परळ, भायखळा ते थेट गिरगावातपर्यंत लोक गनिमी काव्याने पोलिसांशी लढले. मुंबईच्या गिरणी कामगारांनी सारा गिरणगाव किल्ल्यासारखा लढविला. या लढ्यात स्त्रियाही खांद्याला खांदा लावून लढल्या.

त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रावरील कवने गाऊन शाहिरांनी सारा महाराष्ट्र दणाणून सोडला होता. कवनांच्या जोडीला अकलेची गोष्ट, निवडणुकीत घोटाळे, बेकायदेशीर, माझी मुंबई, शेटजींचे इलेक्शन असे कितीतरी तमाशे गाजत होते...

अण्णाभाऊ साठे यांच्या 'माझी मैना गावाकडे राह्यली। माझा जिवाची होते या काहिली' तर शाहीर आत्माराम पाटील यांचा संयुक्त महाराष्ट्राचा गोंधळ तर प्रत्येक शाहिराच्या मुखी होता. पण दुर्दैवाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शाहिरांचं हे मोठं अक्षरधन दुर्लक्षित राहिलं. पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहिरांचं योगदान हे आभाळाच्या ऊंची एवढं आणि सागरा एवढं अथांग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT