Maharashtra Shaheer Box Office Collection latest update kedar shinde ankush chaudhari sakal
मनोरंजन

Maharashtra Shaheer: बॉक्स ऑफिसवर 'महाराष्ट्र शाहीर'ची डफ कडाडली.. सहा दिवसात कमावले..

'महाराष्ट्र शाहीर'ची यशस्वी घौडदौड!

नीलेश अडसूळ

Maharashtra Shaheer Box Office Collection: मराठी मनोरंजन विश्वात सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाची. महाराष्ट्रभर या चित्रपटाची दमदार हवा आहे. प्रेक्षक या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत.

केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात शाहीर साबळेंच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी झळकत आहे तर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत सना शिंदे आहे. तसेच अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे.

महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे यांचा जीवनपट उलगडणारा हा चित्रपट असून त्यांचा संघर्ष आणि कलेतील योगदान या चित्रपटातून दाखवले आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून बॉक्स ऑफिस वर किती कमाई केली ते पाहूया..

(Maharashtra Shaheer Box Office Collection latest update kedar shinde ankush chaudhari)

'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने सहा दिवसातच दणदणीत कमाई केली आहे. सहा दिवसात या चित्रपटाने एकूण 3.33 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या मराठी सिनेमाने ३० लाखांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 55 लाखांची कमाई केली.

तिसऱ्या दिवशी ६० लाख कमावले. चौथ्या दिवशी अर्थात 'महाराष्ट्र दिना'च्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झाली. या सिनेमाने त्या एका दिवसात 1.03 कोटींची कमाई केली.

पाचव्या दिवशी 34 लाख आणि सहाव्या दिवशी 31 लाख इतकी कमाई केली. अशाप्रकारे आतापर्यंत रिलीजच्या सहा दिवसांत या सिनेमाने 3.33 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

अंकुशला आपण आजवर सिनेमा,नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये वेगवेगळ्या रुपात भेटलोय. गेल्या अनेक वर्षांमध्ये अंकुश चौधरीने महाराष्ट्र शाहीर हा केलेला पहिला बायोपिक आहे. अंकुशची प्रमुख भूमिका असलेला आणि केदार शिंदेंनी दिग्दर्शित केलेला महाराष्ट्र शाहीर सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT