Jai Jai Maharashtra Majha, maharashtra shaheer,  SAKAL
मनोरंजन

Jai Jai Maharashtra Majha: शिव ठाकरे ते नागराज मंजुळे.. मराठी कलाकारांनी गायलं 'जय जय महाराष्ट्र माझा' गीत

शाहीर साबळेंचं मूळ गीत असलेलं जय जय महाराष्ट्र माझा चं शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण झालं

Devendra Jadhav

Maharashtra Shaheer Jai Jai Maharashtra Majha New Song News: महाराष्ट्र शाहीर सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. आज शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र शाहीर मधील जय जय महाराष्ट्र माझा गीताचं लोकार्पण झालं.

शाहीर साबळेंचं मूळ गीत असलेलं जय जय महाराष्ट्र माझा चं शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण झालं.

या गीतात शिव ठाकरे पासून भरत जाधव पर्यंत अनेक मराठी कलाकार हे गीत गाताना दिसत आहेत. अजय गोगावले यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायलं आहे.

(maharashtra shaheer movie new song Jai Jai Maharashtra Majha out now)

जय जय महाराष्ट्र माझा गीत शाहीर साबळेंनी गायलं आहे. महाराष्ट्र शाहीर सिनेमानिमित्ताने हे गीत अजय गोगावले यांच्या आवाजात पुन्हा रीक्रियेट केलं गेलंय.

अजय गोगावले यांनी हे गीत गायलं असून या गीतात नागराज मंजुळे, आदेश बांदेकर, प्रथमेश परब, आकाश ठोसर, सिद्धार्थ चांदेकर, स्वप्नील जोशी, शिव ठाकरे, सिद्धार्थ जाधव,

गश्मीर महाजनी, अभिजित खांडकेकर, प्रसाद ओक, उमेश कामत, सुयश टिळक, सचिन खेडेकर, आदिनाथ कोठारे, ललित प्रभाकर असे मराठी कलाकार झळकणार आहेत.

केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाची सध्या सगळीकडे क्रेझ आहे. महाराष्ट्र शाहीर सिनेमाची आतापर्यंत दोन गाणी व्हायरल झालीय.

बहरला हा मधुमास आणि गाऊ नको किसना ही दोन्ही गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

महाराष्ट्रातील तमाम जनतेने या गाण्यावर रील व्हिडिओ बनवून ही दोन्ही गाणी सोशल मीडियावर लोकप्रिय केली. आता या गाण्यांची क्रेझ थेट अमेरिकेत गेलीय.

याआधी महाराष्ट्र शाहीर मधली गाऊ नको किसना आणि बहरला हा मधुमास ही दोन्ही गाणी लोकप्रिय झाली आहेत.

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत झळकणार आहे. २८ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT