Maharashtra Shaheer Trailer  esakal
मनोरंजन

Maharashtra Shaheer Trailer : 'आम्ही कलाकार, मिंधे नाही कुणाचे!' महाराष्ट्र शाहीरचा ट्रेलर भलताच तिखट

महाराष्ट्राला आपल्या शाहीरी आणि पोवाड्यांनी वेड लावणाऱ्या शाहीर साबळे यांच्या आय़ुष्यावरील आधारित या चित्रपटाचा ट्रेलर अंगावर येणारा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Shaheer Trailer viral Director Kedar Shinde : मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार जाधव यांच्या बहुचर्चित अशा महाराष्ट्र शाहीर चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. आता त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

महाराष्ट्राला आपल्या शाहीरी आणि पोवाड्यांनी वेड लावणाऱ्या शाहीर साबळे यांच्या आय़ुष्यावरील आधारित या चित्रपटाचा ट्रेलर अंगावर येणारा आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा रंगली होती. व्हायरल झालेल्या ट्रेलरमध्ये शाहीर साबळे यांच्या आयुष्याचा प्रवास किती खडतर आणि संघर्षमय होता याची एक झलक यानिमित्तानं दिसून आली आहे. यापूर्वी या चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते केदार शिंदे यांनी वेगवेगळ्या पोस्टमधून आपल्या नव्या चित्रपटाविषयीचे अपडेट्स शेयर केले होते.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

महाराष्ट्र शाहीरच्या टीझरला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. शाहीर साबळे यांच्या जीवनावर केदार शिंदे 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट करत असून त्यामध्ये अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे संगीत अजय अतुल करत आहे. या चित्रपटाचे संगीत प्रेक्षकांमध्ये कमालीचे लोकप्रिय झाले आहे. त्यातील अनेक गाणी चाहत्यांच्या आवडीची आहेत. त्यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रिल्स व्हायरल झाले आहेत. खासकरुन बहरला मधूमास हा...या गाण्याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे.

या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या पत्नीची भूमिका केदार यांची मुलगी सना शिंदे तर आजीची भूमिका अभिनेत्री शुभांगी सदावर्ते साकारणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ही देखील या चित्रपटातून समोर येणार आहेत. अभिनेता अतुल काळे ही यशवंतराव चव्हाणांच्या भूमिकेत असतील. 28 एप्रिल 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News : आजोबांनी इंग्रजांना दिले होते ३५००० रुपयांचे कर्ज, नातू १०९ वर्षांनंतर करणार कोट्यवधी वसूल, ब्रिटिश सरकारला पाठवणार नोटीस

Sun on Earth : 100,000,000°C ची उष्णता! चक्क पृथ्वीवर 'सूर्य' बनवतायत बिल गेट्स, जगभर चर्चेत असलेला 'Infinity One' प्रोजेक्ट काय आहे?

Cloudy Weather Impact on Grapes : द्राक्ष उत्पादकांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या 'या' जाळ्यात अडकू नका; पावसाच्या नावाखाली दराची मोठी लूट? तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?

Malvan Achara Road Incident : मालवण-आचरा रोडवर झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, २८ वर्षीय महिलेसोबत नेमकं काय घडलं

अशोक सराफ की लक्ष्मीकांत बेर्डे... अनिल कपूर यांचा आवडता अभिनेता कोण? बॉलिवूडचा लखन म्हणाला-

SCROLL FOR NEXT