Shilpa Shetty Dance Video, Sana Shinde Comment On Video Esakal
मनोरंजन

Maharashtra Shair मधील 'बहरला हा मधुमास नवा' गाण्याची शिल्पा शेट्टीलाही पडली भुरळ..अभिनेत्री सना शिंदेची स्वारी खूश

'बहरला हा मधुमास नवा' या ट्रेन्डिंग गाण्यावर शिल्पा शेट्टीनं धरलेला ठेका सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

Shilpa Shetty Viral Video: केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमा महाराष्ट्रभरात रिलीज झाला आहे. सध्या सिनेमा थिएटरमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण सिनेमाला हवा तसा प्रतिसाद काही मिळालेला दिसत नाही. समिक्षक आणि प्रेक्षक यांच्याकडून सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.

नुकतंच केदारनं 'द केरळ स्टोरी' सिनेमाला राजकीय पाठिंबा मिळाल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील राजकीय नेते 'द केरळ स्टोरी' सिनेमाचं समर्थन करताना दिसत आहेत पण 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाविषयी कोणीच काही बोलताना दिसत नाही. शाहीर माहीत तरी आहेत का या नेत्यांना? असा सवालही त्यानं केला होता.

पण या दरम्यान आता महाराष्ट्र शाहीर सिनेमाचं समर्थन करत शिल्पा शेट्टीनं शेअर केलेला व्हिडीओ सुखावह ठरतआहे. सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्र शाहीर सिनेमा रिलीज होण्याआधीच यातील 'बहरला हा मधुमास नवा' हे गाणं ट्रेन्डिंगला आलं. सोशल मीडियावर तर या गाण्याच्या रील्सचा नुसता खच पहायला मिळाला. अगदी परदेशातील लोकांनाही या गाण्यानं आपल्या तालावर ठेका धरायला भाग पाडलं. आता प्रदर्शनानंतरही हे गाणं सर्वसामान्य लोकांपासून थेट बॉलीवूडकरांनाही भुरळ घालतंय बरं का. शिल्पा शेट्टीनं नुकतंच या गाण्यावर ठेका धरल्याचं समोर आलं आहे.

'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावर ताल धरत शिल्पानं शेअर केलेल्या व्हिडीओवर सध्या नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. शिल्पाचं हे मराठी प्रेम सगळ्यांनाच आवडलं आहे. शिल्पा सारख्या अभिनेत्रीनं माझ्या सिनेमातील गाण्यावर ताल धरणं हा खरंतर पदार्पणातच मला मिळालेला मोठा सम्मान आहे अशी कमेंट 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाची अभिनेत्री सना शिंदे हिनं दिली आहे. सध्या बॉलीवूडकर मराठी सिनेमांना पाठिंबा देताना दिसत आहेत...शिल्पाचा हा व्हिडीओ याचाच एक दाखला म्हणावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

Malshiras Well Accident : हायवे पूर्ण झाल्याचा खोटा दाखला अन् 8 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू! तांदुळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर, कंत्राटदार अजूनही मोकाट

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लिहिले पत्र

FIH Hockey Nations Cup: भारतीय महिला ठरल्या चॅम्पियन! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

FIFA World Cup: पुढचा प्रश्न घ्या... रोनाल्डोची मेस्सी, एम्बापेशी तुलना करणाऱ्या प्रश्नावर चिडचिड

SCROLL FOR NEXT