Maharashtra Shahir 
मनोरंजन

Maharashtra Shahir: बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; कधी आणि कुठे पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या...

Maharashtra Shahir: ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात थिएटरमध्ये रिलीज झाला. आता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Shahir: लोककला म्हटलं की शाहीर साबळेंचं नाव डोळ्यासमोर उभं रहातं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. त्यांच्या जीवन प्रवास ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) या चित्रपटात मांडण्यात आला आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. प्रेक्षक घरबसल्या हा चित्रपट पाहू शकणार आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर कधी आणि कोणत्या चॅनलवर होणार आहे? जाणून घेऊयात...

18 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता आणि रात्री 9 वाजता प्रवाह पिक्चरवर ‘महाराष्ट्र शाहीर’ या बहुचर्चित सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पहाता येणार आहे.

चित्रपटाबद्दल अंकुश चौधरी म्हणाला...

सुपरस्टार अंकुश चौधरीनं या सिनेमात शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे. याविषयी सांगताना अंकुश चौधरी म्हणाला, ‘या सिनेमाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच चरित्रपटात काम केलं आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये शाहीर साबळेंचा मोलाचा वाटा आहे. आपल्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिवर सिनेमा बनणं आणि त्या सिनेमात आपल्यालाच त्या व्यक्तिची भूमिका साकारायला मिळणं यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. अश्या या थोर कलावंताच्या आयुष्यावर बेतलेला महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा घरबसल्या प्रवाह पिक्चरवर पहाता येणार आहे याचा मनापासून आनंद आहे.’

महाराष्ट्र शाहीर सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शाहीर साबळे यांचे नातू आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांभाळली आहे. तर केदार शिंदे यांची लेक सना शिंदेने शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. यासोबतच निर्मिती सावंत, मृण्मयी देशपांडे, अश्विनी महांगडे, अमित डोलावत, शुभांगी सदावर्ते, अतुल काळे आणि दुष्यंत वाघ अशी तगडी कलाकारांची फौज सिनेमात आहे.

मराठीचा स्वाभिमान आयुष्यभर जपणारे, मराठी लोकसंगीत आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारे शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या महाराष्ट्र शाहीर या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पाहायला विसरु नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu And Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये दोन जवान शहीद, एका दहशतवाद्याला धाडलं यमसदनी

'आपल्याला भगवान शिवासारखं व्हायला हवं, तेव्हाच आम्ही जागतिक विश्वगुरु बनू'; RSS प्रमुख मोहन भागवतांचं मोठं विधान

विशेष ट्रेनचा फज्जा, प्रवाशांची रात्र स्टेशनवर अन् रक्षाबंधन ट्रेनमध्ये; ७ तासांनी गाडी सुटली

'या' राखीला चेहऱ्यावर येईल चमक, परफेक्ट सेल्फीसाठी वापरा सोप्या मेकअप ट्रिक्स

Agriculture Department : काळा बाजार करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील बारा कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

SCROLL FOR NEXT