maharashtrachi hasya jatra fame samir chaughule shared post for prabhakar more birthday sakal
मनोरंजन

Samir Choughule: कोकणी मातीतला.. हास्यजत्रा फेम अभिनेत्यासाठी समीर चौघुलेची खास पोस्ट..

कातील मोरे म्हणत समीर चौघुले झाला व्यक्त..

नीलेश अडसूळ

Samir Choughule: गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. घराघरात पोहोचलेल्या या कार्यक्रमाने आपल्याला खळखळून हसवलं.

हास्यजत्रेचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे समीर चौगुले. समीर केवळ अभिनेता नाही तर तो या कार्यक्रमात लेखक म्हणूनही जबाबदारी पाहत आहे. आजवर त्याने आपल्या लेखनीने आणि अभिनयाने प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन केलं आहे.

समीर ने साकारलेला लोचण मजनू असो, शिवालीचा बाबा.. किंवा दाराचा आवाज.. त्याने कायमच आपल्या कलेचे जादू दाखवली आहे. नुकतीच त्याने आपला सहकारी अभिनेता प्रभाकर मोरेसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

(maharashtrachi hasya jatra fame samir chaughule shared post for prabhakar more birthday)

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील एक दिग्गज नट म्हणजे प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे गेली अनेक वर्षे मनोरंजन क्षेत्रात असून त्यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांच्या स्किट मधील त्यांचे शालू.. हे गाणे जवळपास जगभरात प्रसिद्ध झाले आहे.

'कोकणचे पारसमणी' म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा प्रभाकर मोरे यांचा काल वाढदिवास झाला, या निमित्तान समीर याने काही खास शब्दात त्यांचं कौतुक केलं..

समीरने लिहिले की, ''हॅप्पी बर्थ डे प्रभाकर मोर... आमचा हास्य जत्रेचा "कातील मोरे".....आमच्या मोरेंचा स्वॅगच वेगळा आहे....याच टायमिंग, पंच टाकण्या आधी घेतलेला स्टान्स सगळंच अफाट आहे...''

''कोकणी मातीतला कलाकार मालवणी बाणकोटी भाषेत मंचावर अक्षरशः धुमाकूळ घालतो...विशेषतः मल्टी मिलिनीयर वगैरे भूमिकेत हा तुफान भाव खाऊन जातो...जगप्रसिद्ध शालू या नृत्य प्रकाराचा हा जनक आहे....''

'' स्वभावाने अत्यंत साधा सरळ.... रंगभूमीवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव, साक्षात बाबूजी म्हणजेच मच्छिंद्र कांबळी यांच्याबरोबर वस्त्रहरण या नाटकात काम करण्याचा भाग्य आमच्या प्रभाकरला लाभलंय....मित्रा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा'' अशा शब्दात समीर आपल्या मित्राविषयी व्यक्त झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women’s World Cup 2025 Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला खेळाडू हस्तांदोलन करणार?

MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT