Vishakha Subhedar  Facebook
मनोरंजन

'दोन सेकंद धस्सं झालं काळजात..'; विशाखा सुभेदारची पोस्ट चर्चेत

समीर चौघुले यांनीसुद्धा व्यक्त केल्या भावना

स्वाती वेमूल

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' Maharashtrachi Hasya Jatra या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री विशाखा सुभेदार Vishakha Subhedar आणि अभिनेते समीर चौघुले Samir Choughule यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून खास भेटवस्तू मिळाली आहे. लतादीदी हास्यजत्रा पाहतात आणि त्यांना त्यातील कलाकारांचं काम आवडतं म्हणूनच त्यांनी या भेटवस्तू पाठवल्या आहेत. लतादीदींकडून या भेटवस्तू मिळाल्यानंतर विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. भेटवस्तूवरील कार्डावर लता मंगेशकर यांचं नाव वाचून दोन सेकंद काळजात धस्सं झालं, असं विशाखाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

विशाखा सुभेदारची पोस्ट-

'काय बोलू... शब्द हरवले आणि डोळे वाहू लागले. घरी एक पार्सल आलं आणि त्यावर एक कार्ड होतं आणि चमचमत्या कागदात गुंडाळून एक 'क्षण' आला, जो 'सुख' आणि 'आनंद' घेऊनच आला. त्यावरचं नाव वाचलं आणि दोन सेकंद धस्स झालं काळजात. लता मंगेशकर! त्या कायम हास्यजत्रा पाहतात आणि त्यांना आमचं काम आवडत म्हणून त्यांनी आशीर्वाद रुपी भेट पाठवली. त्यांनी केलेलं हे कामाचं कौतुक आणि आवर्जून पाठवलेली भेट. मी ठार झालेय खरंतर, देवा अजून काय हवंय! यासाठी मी कायम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची आभारी असेन आणि ज्यांनी आम्हाला घडवलं ते सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि सोनी मराठीचेदेखील आभार. अमित फाळके, अजय भालवणकर आणि आमची संपूर्ण जत्रेची टीम आणि या यशात तुझ्याशिवाय सम्या (समीर चौघुले) काहीही शक्य नव्हतं,' अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

समीर चौघुलेंची पोस्ट-

'निसर्ग किती ग्रेट आहे नं! शब्द संपले की भावनांना वाट मिळावी म्हणून त्याने अश्रूंची निर्मिती केली. आज ते प्रकर्षाने जाणवलं. आज सुरांची आणि स्वरांची सरस्वती आदरणीय लता मंगेशकर दीदींनी अत्यंत प्रेमाने घरी एक भेटवस्तू आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी पाठवली आणि ती ट्रॉफी म्हणजे दीदींच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा आणि आशीर्वाद. थिजून जाणं म्हणजे काय ते आज मला कळलं. लतादीदी महाराष्ट्राची हास्यजत्रा नेहमी बघतात आणि खूप हसतात, एन्जॉय करतात.. ही आम्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा कुटुंबियांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. हा सुवर्ण क्षण आयुष्यात आला तो फक्त आणि फक्त आमच्या हास्यजत्रा कुटुंबामुळे. मनःपूर्वक आभार सोनी मराठीचे हेड श्री. अजय भालवणकर सर, नॉन फिक्शन हेड अमित फाळकेसर, ईपी गणेश सागडे, सिद्धूगुरू जुवेकर आणि आमचं विद्यापीठ सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोटे सर, ज्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे केवळ अशक्य होतं आणि खास आभार माझी पार्टनर विशाखा सुभेदार. विशू आपल्या जोडीच्या यशात तुझा खूप मोठा वाटा आहे, तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे,' असं लिहित त्यांनी संपूर्ण टीमचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

Major Mohit Sharma: भारताचा खरा 'धुरंधर' मोहित शर्मा जेव्हा इफ्तिखार भट्ट झाला, काश्मिरमध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

सिनेमा फक्त त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कसा दाखवता? 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावर शरद पोंक्षे म्हणतात- 'केवळ ब्राह्मणद्वेषातून…'

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

SCROLL FOR NEXT