Maharashtrachi Hasya Jatra is no longer a family show fans comment on social media actor prithvik pratap answered him  sakal
मनोरंजन

Maharashtrachi Hasya Jatra: पॉर्न बघणाऱ्यांनी 'हास्यजत्रे'वर टीका करू नये.. 'त्या' कमेंटवर भडकला अभिनेता..

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमावर आता टीका होऊ लागली आहे.

नीलेश अडसूळ

Maharashtrachi Hasya Jatra: महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम पाहिला जातो. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमानी रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत हा कार्यक्रम पाहिला जात असून रसिक मायबाप या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देताहेत. दर्जेदार विषय, विनोदाची आतिषबाजी आणि हास्याचा स्फोट यामुळे या कार्यक्रमाने वेगळीच ऊंची गाठली आहे.

या कार्यक्रमाला इतकी प्रसिद्धी मिळाली आहे हि लोक प्रवासात आपल्या मोबाइलवरही हाच कार्यक्रम पाहत असतात. पण आता या कार्यक्रमावर टीका होऊ लागली आहे. एका नेटकाऱ्याने या कार्यक्रमाच्या बदलत्या स्वरूपावर आक्षेप घेतला आहे.

(Maharashtrachi Hasya Jatra is no longer a family show fans comment on social media actor prithvik pratap answered him )

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील एक लोकप्रिय कलाकार म्हणजे पृथ्विक प्रताप. त्याने नुकतंच सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने चाहत्यांना प्रश्न विचारण्याची, काहीतरी सांगण्याची संधी दिली होती. यावेळी नेटकाऱ्याने थेट 'हास्यजत्रे'वर टीका केली.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा आता कुटुंबासोबत पाहण्यासारखा शो राहिलेला नाही. कुटुंबाबरोबर बसून हा कार्यक्रम मी बघत असताना एखाद्या जोकवर हसलो तर तिथेच विषय संपतो.' असं या नेटकऱ्याने म्हंटलं आहे.

पण हे म्हणणं पृथ्विकने लगेचच त्यावर कमेंट करत खोडून टाकलं आहे. पृथ्विकने अगदीच मोजक्या शब्दात पण सणसणीत उत्तर देऊन त्याचा समाचार घेतलेला आहे.

Maharashtrachi Hasya Jatra is no longer a family show fans comment on social media actor prithvik pratap answered him

पृथ्वीकनेही त्या टिकेचा फोटो शेयर करत खाली लिहिलं आहे की. ''Incognito मोडमध्ये जाऊन पॉर्न बघणाऱ्यांनी कौटुंबिक कार्यक्रमच पाहायचा अशी पिपाणी वाजवू नये. दिवसाला आई-बहिणींवरुन शंभर शिव्या देणाऱ्यालाही वेगळ्या अर्थाचा एखादा पंच आला की, त्रास होतो. वाह रे दुनिया.'' असे अगदी मार्मिक उत्तम पृथ्वीकने दिले आहे. या उत्तराची सध्या बरीच चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT