maharashtrachi hasyajatra fame actress dattu more shared photo post with wife swati ghugane after marriage sakal
मनोरंजन

Dattu More: लग्न होताच हास्यजत्रा फेम अभिनेत्याने बायकोसोबत शेअर केला खास फोटो, म्हणाला; नवा सोबती..

अभिनेता दत्तू मोरे अडकला विवाहबंधनात..

नीलेश अडसूळ

Dattu More wedding photo: कलाकारांचं प्रेम, लग्न याविषयी कायमच सर्वांना उत्सुकता असते. विशेष म्हणजे कलाकारांचे लग्न सोहळे, त्यातली फॅशन, त्याचा डामदौल याची बरीच चर्चा होताना दिसते. अशीच एका अभिनेत्याच्या लग्नाची चर्चा कालपासून सुरू आहे.

तो अभिनेता आहे, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरे. अभिनेता दत्तू मोरेनं नुकतीच लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाच्या प्री-वेडिंगची बरीच चर्चा झाली. आता लग्नानंतर दत्तूने एक खास फोटो शेयर कर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

(maharashtrachi hasyajatra fame actress dattu more shared photo post with wife swati ghugane after marriage)

गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. हा कार्यक्रम घराघरात नाही तर मनामनात पोहोचला आहे. याच कार्यक्रमातील एक महत्वाचा भाग म्हणजे अभिनेता दत्तू मोरे.

आजवर दत्तूच्या विनोदाने रसिकांचे भरपूर मनोरंजन केले. त्याचा मिश्किलपणा, खट्याळ प्रवृत्ती ही त्याच्या व्यक्तिमत्वाची खासियत आहे. दत्तू मंचावर आला की विनोदाची आतिषबाजी होते. असा सर्वांना खळखळून हसवणारा दत्तू मोरे काल विवाहबंधनात अडकला.

त्यानंतर त्याने एक पोस्ट शेयर केली आहे. लग्नानंतर बायकोसोबत त्याने फोटो शेयर केला आहे. दोघेही पारंपरिक वेशात असून दत्तूने शेरवाणी तर त्याच्या पत्नीने शालू परिधान केला आहे. डोक्यावर बाशिंग, मुंडवळ्या यामुळे ते दोघे खूपच गोड दिसत आहेत.

हा फोटो शेयर करत दत्तू ने लिहिले आहे की, ''नवा सोबती, नवी सुरूवात.. आशिर्वाद असूद्या..'' असे दात्तू म्हणाला आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट करत दत्तूचे अभिनंदन कर त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT