Namrata Sambherao, Namrata Sambherao news, maharashtrachi hasyajatra SAKAL
मनोरंजन

Namrata Sambherao: थेट विराट कोहलीशी तुलना.. नम्रताचा लहानपणीचा फोटो बघून नेटकरी चक्रावले

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे

Devendra Jadhav

Maharashtrachi Hasyajatra Actress Namrata Sambherao News: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. नम्रता आणि प्रसाद खांडेकर हि हास्यजत्रेतली जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

दोघांचं विनोदी स्किट पाहणं हा फॅन्ससाठी निखळ आनंद देणारा अनुभव असतो. सध्या सोशल मीडियावर ९० च्या काळाचे फोटो शेयर करण्याचा आगळावेगळा ट्रेंड सुरु आहे.

हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावने सोशल मीडियावर एक फोटो शेयर केलाय.

(maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao Direct comparison with Virat Kohli)

हेही वाचा: शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

नम्रताने तिचा बालपणीचा फोटो शेयर केलाय. या फोटोशी तुलना थेट विराट कोहलीशी केली जातेय. नम्रताचा लहानपणीचा लूक पाहून ती अगदी विराट कोहलीसारखी दिसतेय अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

"पावली अवली विराट कोहली..", "विराट कोहली..", "बाप रे... काय करारीपणा आहे नजरेत लहानपणा पासुनच...नम्रता तु खरच महान आहेस. कुठलीही भुमिका अगदी सहज शिताफीने साकारणारी...कम्माल आहेस कम्माल.

तुझी अशीच वाटचाल सुरू राहो व तुझा तुझ्या अभिनयाचा डंका दाही दिशांत दुमदुमावा हिच हृद्य सदिच्छा...." अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी नम्रताची तुलना थेट विराट कोहलीशी केलीय.

सोनी मराठी वरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमानंतर महाराष्ट्राचे भरभरून मनोरंजन करणारी आणखी एक मालिका आली ती म्हणजे, 'पोस्ट ऑफिस उघडं आहे'.

एका वेगळा विषय आणि आशय घेऊन ही मालिका आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. हि मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने ९० च्या काळातील फोटो कलाकार शेयर करत आहेत.

नव्वदच्या दशकातला पोस्ट ऑफीसचा काळ या मालिकेत दाखवण्यात आला होता. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण आता तीन महिन्यांतच ही मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. या मालिकेचा शेवटचा भाग 2 एप्रिल ला प्रसारित झाला.

या मालिकेमध्ये समीर चौघुले, दत्तू मोरे, वनिता खरात, शिवाली परब, प्रभाकर मोरे, ईशा डे, पृथ्वीक प्रताप, आशुतोष वाडेकर यांबरोबरच ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आपले भरभरून मनोरंजन केले.

नम्रता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा सोबतच कुर्रर्रर्र नाटकात अभिनय करतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT