Onkar Bhojane, Onkar Bhojane news, Onkar Bhojane dream role, Onkar Bhojane maharashtrachi hasyajatra, Onkar Bhojane   comedy videos
Onkar Bhojane, Onkar Bhojane news, Onkar Bhojane dream role, Onkar Bhojane maharashtrachi hasyajatra, Onkar Bhojane comedy videos SAKAL
मनोरंजन

Onkar Bhojane: मला महाराजांचा मावळा व्हायचंय.. ओंकारने सांगितले त्याचे ड्रीम रोल्स

Devendra Jadhav

Onkar Bhojane Dream Roles News: महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. ओंकारने हास्यजत्रा जरी सोडली असली तरी विविध माध्यमांमधून तो फॅन्सच्या संपर्कात राहिला.

त्याच्या अभिनयाची जादू सर्वांना दाखवत राहिला. ओंकार सध्या 'करून गेलो गाव' या धुमशान घालणाऱ्या मालवणी व्यावसायिक नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नाटकाची सध्या जोरदार चर्चा असून 'हाऊसफुल्ल'च्या पाट्या झळकत आहेत.

याच निमित्ताने हरहुन्नरी ओंकारशी सकाळ unplugged मध्ये दिलखुलास संवाद साधला. यावेळी ओंकारने त्याला आयुष्यात कोणते ड्रीम रोल्स साकारायचे आहेत याचा खुलासा केला.

(maharashtrachi hasyajatra fame onkar bhojane dream role is to play shivaji maharaj mawla)

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ Unplugged मध्ये ओंकारला त्याच्या मनातली भूमिका किंवा एखादा ड्रीम रोल कोणता? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ओंकारने खास उत्तर दिलं.

ओंकार म्हणाला."खऱ्या आयुष्यात मला पोलीस होता आलं नाही त्यामुळे मला चित्रपटात तरी पोलीस साकारायचाय. ते कॅरेक्टर मला करायला आवडेल नेहमी..

मी याआधीही म्हटलं आहे की महाराजांचा एखादा मावळा साकारायला आवडेल .. आणि एखादा खेळाडू.."

ओंकारने पुढे खुलासा केला.. "जे मी खऱ्या आयुष्यात होऊ नाही शकलो.. आपलं तेच असतं ना जे आपल्याला खऱ्या आयुष्यात होता येत नाही ते या कल्पनेच्या जगात मालिका, नाटक, सिनेमाच्या जगात.. आपल्याला ते आजमावून बघता येतं करून बघता येतं..

आपल्याला ते स्वतः वर सजवताना मजा वाटते.. पोलीस म्हणून तो रुबाब मिरवू शकतो. किंवा खेळाडू म्हणून तो Attitude..

तर या सगळ्या गोष्टी म्हणून हे कॅरेक्टर ड्रीम रोल म्हणून माझ्या लिस्ट मध्ये आहेत. एक पोलीस इंस्पेटर, एक महाराजांचा मावळा, एक खेळाडू माझ्या लिस्ट मध्ये आहेत." असा खुलासा ओंकारने केला.

याच मुलाखतीत ओंकार भोजनेनं त्याची क्रश कोण आहे तिचं नावही घेतलं आहे तर आपल्या काही बालपणीच्या आठवणीही जागवल्या आहेत.

तसंच मुलाखतीत त्यानं आपण हास्यजत्रेशी अजूनही जोडेलेले आहोत हे देखील सांगितलं आहे बरं का. ओंकार भोजनेची ही पॉडकास्ट मुलाखत बातमीत जोडलेली आहे तेव्हा नक्की ऐका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs CSK : गुजरात करो या मरो स्थितीत; सीएसके प्ले ऑफच्या शर्यतीत सेफ होण्यासाठी जोर लावणार

SRH vs LSG: लखनौचा लाजीरवाणा पराभव अन् संघमालकांनी राहुलला झाप-झाप झापलं; सोशल मीडियावर नुसता मीम्सचा पाऊस

चिरंजीवीला पद्मविभूषण तर होर्मुसजी एन कामा यांना पद्मभूषण, अनेक दिग्गजांचा आज राष्ट्रपतींकडून सन्मान!

Sushma Andhare: मराठी माणसाच्या मुद्द्यावरुन सुषमा अंधारेंचं रेणुका शहाणेंना पत्र; म्हणाल्या, आक्रस्ताळेपणा करणाऱ्यांना...

PBKS vs RCB Live Score : सामन्यात व्यत्यय! आरसीबीचा धडाका पावसामुळे थांबला

SCROLL FOR NEXT