Vanita Kharat Podccast Esakal
मनोरंजन

Vanita Kharat Podcast: 'जेव्हा ओंकार भोजनेनं हास्यजत्रा सोडली...', वनितानं सांगितला 'तो' भावूक क्षण

ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत वनितानं आपल्या वैयक्तिक तसंच प्रोफेशनल आयुष्याविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

प्रणाली मोरे

Vanita Kharat Podccast: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सध्या घराघऱात पाहिला जातो. या कॉमेडी शो मधील सगळेच कलाकार सध्या लोकांच्या मनावर राज्य करतात. विशाखा सुभेदार,ओंकार भोजने या कलाकारांनी हास्यजत्रा सोडली तेव्हा खूप चर्चा रंगलेली पहायला मिळाली. त्यांचे चाहते नाराज झालेले देखील दिसले. पण शो मस्ट गो ऑन...

हास्यजत्रा या शो च्या निमित्तानं ईसकाळनं नुकताच संवाद साधला तो अभिनेत्री वनिता खरात हिच्याशी. वनिता हे सध्या शो मधलं चर्चेतलं नाव आहे. सोशल मी़डियावर देखील ती भलतीच ट्रेन्डिंगला आहे.

ईसकाळला दिलेल्या मुलाखतीत वनितानं हास्यजत्रेतील स्कीट दरम्यानचे काही सीक्रेट्स,..आपलं पहिलं ऑडिशन,.ओंकार भोजनेचं शो सोडून जाणं अशा अनेक गोष्टींवर मनमोकळा संवाद साधला आहे. (Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat Podcast)

वनिता खरात सध्या सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळते. ती अनेकदा पोस्ट करते त्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसतात. सोशल मीडियावरील ट्रोलिंगला घेऊन वनितानं या पॉडकास्ट मुलाखतीत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

वनितानं सुंदरता म्हणजे नेमकं काय याची आपली अशी एक व्याख्या सांगताना महिलांना स्वतःकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन दिला आहे. हास्यजत्रेमुळे प्रसिद्धि मिळाली पण रिजेक्शन आजही वाट्याला येतं तेव्हा नेमकं आपण काय करतो यासंदर्भातही वनितानं भाष्य केलं आहे. तेव्हा ते ऐकण्यासाठी आपल्याला बातमीत जोडलेली मुलाखतीची लिंक नक्की ऐका.

ओंकार भोजने अन् वनिताची घनिष्ट मैत्री आहे. नुकताच हास्यजत्रा सोडल्यानंतर ओंकार वनिताच्या सासरी तिला भेटायला आणि शुभेच्छा द्यायला गेला होते तेव्हाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता .

पॉडकास्ट मुलाखतीत वनितानं ओंकारनं हास्यजत्रा सोडण्यामागचं काय कारण असू शकतं हे सांगतानाच ज्यावेळी ओंकारनं पहिल्यांदा तिला त्याचा निर्णय सांगितला होता तेव्हा ती त्याला काय म्हणाली होती हे देखील शेअर केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT