maharashtrachi hasyajatra fem actress vanita kharat celebrate holi in chawl with husband sumit londhe sakal
मनोरंजन

Vanita Kharat: वनिता खरातला पाहण्यासाठी लोकांची गर्दी! थेट चाळीत जाऊन साजरी केली पहिली होळी..

अभिनेत्री वनिता खरातने नवऱ्यासोबत होळीच्या सणाचा आनंद लुटला..

नीलेश अडसूळ

Vanita Kharat: गेली काही वर्षे महाराष्ट्राला वेड लावलंय ते  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे. या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांना भरभरून हसवलं. या कार्यक्रमाला आणि त्यातील कलाकारांना प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. त्याच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री वनिता खरात..

वनिता ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. प्रेक्षकांना खळखळून हसविणारी वनिता काही दिवसांपूर्वीच विवाहबद्ध झाली. तिच्या लग्नाची, प्री वेडींग शूटची बरीच चर्चा झाली. आता चर्चा आहे ती तिच्या पहिल्या होळी सणाची..

वनिताची ही लग्नानंतरची पहिली होळी होती. त्यामुळे तिने होळीचा सण तिनं तिच्या नवऱ्यासोबत एकदम दणक्यात साजरा केला आहे. यावेळी ती आपल्या चाळीत गेली होती. यावेळी वनिताला पाहण्यासाठी चाळीतल्या मंडळींनी एकच गर्दी केली होती.

या सोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेयर केले आहेत. ज्यामध्ये ती आणि तिचा नवरा सुमित लोंढे चाळीमद्धे होळी साजरी करताना दिसत आहेत. आणि त्यांच्या मागे सर्व चाळकरी जमले आहेत.

त्यानंतर वनिता आणि सुमित दादर येथील शिवाजी पार्क येथे धुळवडीचा आनंद लुटायला गेले. एकमेकांना रंग लावत त्यांनी सुंदर फोटोही सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. यावेळी वनिताच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी पाहण्यासारखा आहे.


वनिताने २ फेब्रुवारीला प्रियकर सुमित लोंढे सोबत लग्न केले. मोजक्याच मंडळींच्या उपस्थित वनिताचा पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. यावेळी वनिताची जवळची मित्र मंडळी आणि हास्यजत्रेची संपूर्ण टीम हजर होती. वनिताचा नवरा सुमित एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT