Maharashtrachi Hasyajatra: महाराष्ट्र गाजवून हास्यजत्रेची हवा परदेशात, या देशात घालणार धुमाकूळ SAKAL
मनोरंजन

Maharashtrachi Hasyajatra: महाराष्ट्र गाजवून हास्यजत्रेची हवा परदेशात, या देशात घालणार धुमाकूळ

महाराष्ट्र गाजवून आता हास्यजत्रा परदेशातील नागरिकांना हसवणार आहे.

Devendra Jadhav

लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सुरुवातीपासून चर्चेत आहे. आठवड्यातले चार दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत हा कार्यक्रम पाहिला जातो. महाराष्ट्र गाजवून आता हास्यजत्रा परदेशातील नागरिकांना हसवणार आहे.

(Maharashtrachi hasyajatra laughter going to abroad in this country)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ची पहिली परदेश वारी होणार आहे. अभिनेता प्रसाद खांडेकरने हास्यजत्रेतील कलाकारांसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. "दुबई साठी रवाना, महाराष्ट्राची हास्यजत्रेची पहिली आंतरराष्ट्रीय टूर" असं कॅप्शन या फोटोखाली देण्यात आलंय. एकूणच इतका मोठा परदेश दौरा असल्याने कलाकार आनंदात आहेत.

जेव्हा संपूर्ण जग कोवीडसारख्या महामारीने त्रस्त होतं, तेव्हा या कार्यक्रमाने रसिकांना दुःख, त्रास, टेन्शन सगळं विसरायला भाग पाडलं. अनेकांना हास्याचा डोस देऊन ठणठणीत बरं केलं. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाने छोटासा ब्रेक घेतलेला. आता नव्या जोमाने हा कार्यक्रम पुन्हा एकदा दणक्यात सुरू झाला आहे. प्राजक्ता माळी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. तर प्रसाद ओक, सई ताम्हणकर या कार्यक्रमाचं परीक्षक आहेत.

एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हास्यजत्रेतील बहुतेक कलाकारांना घेऊन सोनी मराठीने 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' हि नवी मालिका सुरु केलीय. या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हास्यजत्रेने आजवर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत लाईव्ह शो केले आहेत. आता दुबई दौऱ्यानिमित्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रेतील कलाकार पहिल्यांदाच परदेश वारी करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China-Pakistan Relation: सेकेंड स्ट्राइक क्षमतेच्या शोधात पाकिस्तान? चीनकडे अणु पाणबुड्यांची मागणी; मोठी रणनीती उघड

Mumbai Ahmedabad Highway Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक; ३-४ ठार, २५ हून अधिक जखमी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारवर दबाव वाढला! वेतन आयोगासमोर कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मोठ्या मागण्या

नवरा कोट्यवधींचा मालक तरीही लोकप्रिय अभिनेत्रीवर आली शेण उचलायची वेळ? व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा, इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप बंद

SCROLL FOR NEXT