Vanita Kharat  Esakal
मनोरंजन

Vanita Kharat Wedding: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात अडकली विवाहबंधनात, फोटो व्हायरल

अभिनेत्री वनिता खरात आज विवाहबंधनात अडकली

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री वनिता खरात आज विवाहबंधनात अडकली. नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वनिताने प्रियकर सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधली आहे. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वनिता व सुमितचा लग्नसोहळा धुमधडाक्यात पार पडला.

लग्नासाठी वनिताने पांढऱ्या रंगाची साडी नऊवारी साडी नेसून मराठमोळ्या लूकमध्ये दिसून आली आहे. गुलाबी रंगांचा डिझायनर ब्लाऊज व पैठणी शेल्यात नववधू वनिता नटली. अभिनेत्री प्राजक्ता माळीने दिलेल्या प्राजक्तराजच्या पारंपरिक दागिन्यांमध्ये वनिताचं सौंदर्य खुलून आलं होतं. सुमितने शेरवानी परिधान करत शाही लूक केला. वनिता व सुमितच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत.

दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.वनिता नववधूच्या वेशात खूप सुंदर दिसत आहे. वनिता आणि सुमितच्या लग्नाची सगळीकडेच चर्चा होती. आता अखेर दोघे लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.महाराष्ट्राची हास्यजत्रेची टीम सुद्धा या दोघांच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाली आहे. या जोडप्यावर आता चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वनिता व सुमितच्या लग्नात महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. वनिताच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांचे मेहेंदी व हळदी सोहळ्यातील फोटोही व्हायरल झाले होते. वनिता व सुमितने लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सेलिब्रिटी व चाहत्यांनी वनिताला शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT