Maherchi Sadi 2  esakal
मनोरंजन

Maherchi Sadi 2 : 'माहेरची साडी' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! 30 वर्षांनी येणार दुसरा भाग

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ज्या मराठी चित्रपटांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली त्यामध्ये माहेरची साडी या चित्रपटाचे नाव घेता येईल.

सकाळ डिजिटल टीम

Maherchi Sadi 2 marathi movie Alka Kubal : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ज्या मराठी चित्रपटांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली त्यामध्ये माहेरची साडी या चित्रपटाचे नाव घेता येईल. शहरी, ग्रामीण भागातील महिला वर्गामध्ये या चित्रपटाची मोठी क्रेझ होती. प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी केलेल्या अभिनयाचे प्रचंड कौतूक झाले होते. तीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा आता दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

झी मराठीच्या अवॉर्डच्या सोहळ्यात अलका कुबल यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे.यावेळी त्यांना माहेरची साडी २ मध्ये आता त्या सासूच्या भूमिकेत सुनेचा छळ करताना दिसणार का असा मिश्किल प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी मला देखील या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याचे कळले आहे. अजुन त्याविषयी अधिक माहिती नाही. असे अलका यांनी सांगितले होते.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

माहेरची साडी यामध्ये अलका कुबल यांनी सुनेची भूमिका केली होती. त्यांच्या या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतूकही झाले होते. मराठी प्रेक्षकांनी अलका कुबल यांची प्रशंसा केली होती. त्या चित्रपटानं अलकाजी घराघरात ओळखल्या जाऊ लागल्या होत्या. या चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली होती.

विजय कोंडके यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले, रमेश भाटकर, विजय चव्हाण, जयश्री गडकर, भालचंद्र कुलकर्णी, जयराम कुलकर्णी, उषा नाडकर्णी, अजिंक्य देव यांच्या भूमिका होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

आजचे पंचांग 12 जुलै 2026! प्रदोष, शिवरात्री, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Sangli Politics : जयंत पाटलांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांचे पद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आता 15 दिवसांत काय होणार?

IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाचा सुपडा साफ! इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली; श्रेयस अय्यरच्या संघाचे वस्त्रहरण...

Cheese Omelette Paratha: ब्रेड-ऑम्लेटला द्या ब्रेक! रविवारी बनवा हा भन्नाट चिज ऑम्लेट पराठा

SCROLL FOR NEXT