maherchi sadi movie complete 31 years release date cast alka kubal ramesh bhatkar vikram gokhle usha nadkarni ajinkya deo ashalata  sakal
मनोरंजन

'माहेरची साडी'नं 31 वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर केला होता राडा, आजही रडतात बायका..

अलका कुबल यांच्या 'माहेरची साडी' या चित्रपटाला 31 वर्षे झाली, जाणून घ्या या चित्रपटाने कसा घडवला होता इतिहास..

नीलेश अडसूळ

maherchi sadi : महाराष्ट्रात चित्रपटांच्या इतिहासातील एक महत्वाचा चित्रपट म्हणजे 'माहेरची साडी'. अलका कुबेर कुबल यांचा हा चित्रपट जवळजवळ २५ आठवडे तुफान चित्रपटगृहात चालत होता. या चित्रपटाने घराघरातील महिलांना अक्षरशः रडवले. हा चित्रपट इतका गाजला की 'माहेरची साडी' माहित नाही असा कुणीही नाही. या चित्रपटापासून अलका ताईंची आदर्श सून म्हणून झालेली ओळख आजही तशीच आहे. या चित्रपटाचा प्रभाव इतका आहे की, आजही कित्येक महिला हा चित्रपट पाहून रडतात. अशा या 'माहेरच्या साडी'ला आज 31 वर्षे पूर्ण झाली. जाणून घेऊन हा इतिहास घडवणारा चित्रपट कसा होता..

'सासरला ही बहीण निघाली.. भावाची लाडी.. नेसली माहेरची साडी' हे गाण आजही आपण प्रत्येक लग्नात ऐकतोच. हे गाणं ऐकताच प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणवतात. हे लोकप्रिय गाणं देखी 'माहेरची साडी' मधलं आहे. 'माहेरची साडी' हा चित्रपट  १८ सप्टेंबर १९९१ साली रिलीज झाला होता. हा मराठीतील एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन विजय कोंडके  यांनी केले होते. तर प्रमुख भूमिकेत अलका कुबल (alka kubal), रमेश भाटकर, उषा नाडकर्णी, आशालता, विक्रम गोखले, अजिंक्य देव असे दिग्गज कलाकार होते.

बहीण भावाची, बाप लेकीची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत १२ कोटीची कमाई केली होती. त्यावेळी इतकी कमाई करणारा हा विक्रमी चित्रपट ठरला होता. आजही अनेक चित्रपटांना कोटींची कमाई करणे शक्य होत नाही [न माहेरच्या साडीने 31 वर्षांपूर्वी ही जादू केली होती.

माहेरची साडी चित्रपट दोन वर्षांहून अधिक काळ प्रभात टॉकीज वर चालला. या चित्रपटातून उत्तम कौटुंबिक वास्तव, प्रेम, माया याचे दर्शन घडले. प्रत्येक बाईला हा चित्रपट आपला वाटून गेला. अगदी आजही या चित्रपटाची तितकीच लोकप्रियता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT