Mahesh Babu to fund 40 students’ education in remembrance  esakal
मनोरंजन

Mahesh Babu : वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूनं घेतला मोठा निर्णय, त्यानं...

टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या स्टाईल आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतो.

युगंधर ताजणे

Mahesh Babu to fund 40 students’ education in remembrance : टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या स्टाईल आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. आपल्या रोखठोक अंदाजानं त्याला लाईमलाईटमध्ये आणलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं बॉलीवूडमध्ये काम करण्यावर व्यक्त केलेलं मत वादाचा विषय ठरला होता.

आता महेश बाबू हा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. महेश बाबूच्या वडिलांचे कृष्णा यांचे निधन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झाले होते. त्याला आता एक वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्तानं त्यानं एक मोठा निर्णयही घेतला आहे. साऊथच्या अभिनेत्यांबाबत एक गोष्ट नेहमीच सांगितले जाते. ते सामाजिक कामांमध्ये जास्त सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या काळात देखील विविध सेलिब्रेटींनी चाहत्यांना मोठा दिलासा दिला होता. Mahesh Babu to fund 40 students’ education in remembrance

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

महेश बाबूनं देखील चाहत्यांसाठी समाजोपयोगी उपक्रम राबवून आपल्या दातृत्वशीलतेचा प्रत्यय चाहत्यांना करुन दिला होता. त्याचे खूप कौतुकही झाले होते. आता महेश बाबूनं वडिलांच्या पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं घेतलेल्या निर्णयाचे त्याच्या चाहत्यांनी स्वागत केले आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. महेश बाबूनं तब्बल ४० विद्यार्थ्यांचे पालकत्व घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर महेश बाबूवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. यावेळी एका खास कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले होते. त्याला महेश बाबू त्याची पत्नी नम्रता शिरोडकर उपस्थित होते. याबरोबरच महेशच्या कुटूंबातील अनेक सदस्यांनी हजेरी लावली होती. त्यात अशोक गल्ला, शरन कुमार आणि महेशच्या बहिणींचा समावेश होता. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांनी कृष्णा यांच्या आठवणींना उजाळा दिला.

महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांनी २०२० मध्ये महेश बाबू फाउंडेशनची स्थापना केली होती. त्यातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे. आता महेशनं सुपरस्टार कृष्णा एज्युकेशनल फंडची निर्मिती केली असून त्यातून ४० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती लागू असणार आहे.

महेश बाबूचे आगामी प्रोजेक्टस...

महेश बाबूचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही प्रचंड असल्याचे दिसून आले आहे. येत्या काळात त्याचे वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यात त्याचा बहुचर्चित गुंटूर कारम चर्चेचा विषय आहे. त्याच्या या प्रोजेक्टमध्ये प्रसिद्ध फिल्ममेकर्स एस एस राजामौली आणि त्रिविक्रम श्रीनिवास यांची महत्वाची भूमिका आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार त्रिविक्रमच्या गुंटूरच्या कारमच्या स्क्रिप्टवर चर्चा सुरु आहे. हा चित्रपट पुढील वर्षी संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT