Dayaa Web Series Sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन : दया : क्राइम थ्रिलरच्या चाहत्यांसाठी...

क्राइम थ्रिलर आवडणाऱ्या प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्म कधीच निराश करत नाही.

महेश बर्दापूरकर

क्राइम थ्रिलर आवडणाऱ्या प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्म कधीच निराश करत नाही. ‘दया’ ही डिस्ने हॉटस्टारवरील वेबसीरीज मोठे ट्विस्ट, ‘सत्या’फेम ॲक्टर जे. डी. चक्रवर्तीचा अभिनय, विवेक कालेपू यांचं दिग्दर्शन, वेगाने फिरणारा कॅमेरा व शेवटी पुढील भागाबद्दल निर्माण केली जाणारी उत्सुकता यांच्या जोरावर खिळवून ठेवते. कथेचा काहीसा संथ वेग आणि ढोबळ चुका या त्रुटीही आहेत.

‘दया’ची सुरुवात काकीनाडा या बंदरावर होते. फ्रिजर व्हॅन चालवणारा दया (जे. डी. चक्रवर्ती) अबोल, स्वतःच्या कामात व्यग्र असणारा व्यक्ती आहे. त्याची पत्नी अलीवेलू (इशा रेब्बा) गरोदर आहे व अधिकचे पैसे मिळवण्यासाठी तो आपला मित्र प्रभाच्या (जोश रवी) मदतीनं एक ट्रिप घेतो. दयाला माल पोचवताना आपल्या व्हॅनमध्ये एक मृतदेह असल्याचं लक्षात येतं.

हा मृतदेह एक न्यूज चॅनेलची पत्रकार कविता नायडू (राम्या नम्बिसन) यांचा असल्याचं स्पष्ट होतं. ती स्वेच्छा नावाच्या एका मुलीच्या बलात्कारप्रकरणाच्या मागावर असते आणि त्यात तिला स्थानिक आमदार परशुरामराज (पृथ्वीराज) याचा हात असल्याचा संशय असतो. दया या प्रकरणापासून दूर जाऊ पाहत असतानाच त्याला मृतदेह ताब्यात देण्यासंदर्भात एक फोन येतो आणि गूढ वाढतच जाते. मृतदेह असलेली व्हॅन गायब होते आणि दया पूर्णपणे अडकतो.

पोलिसांचा संशय दयावर आणि त्याच्या पत्नीवर असतो. कविताचा पती तिच्यापासून घटस्फोट घेऊन दुसऱ्या महिलेच्या तयारीत असल्याचं समजल्यानं पोलिसांना त्याच्यावरही संशय असतो. कविताची सहकारी पत्रकार शबाना (विष्णू प्रिया) दयासाठी एका पेन ड्राईव्हसंदर्भातील माहिती घेऊन येते व गुंतागुंत अधिकच वाढते.

कविताचा खून कोण करतं, तिचा मृतदेह दयाच्या व्हॅनमध्ये कसा पोचतो, दया आणि त्याची पत्नी नक्की कोण असतात, न बोलता अनेकांचे खून करणारे गूढ व्यक्ती कोण असते, स्वेच्छाच्या बलात्काराचं नेमकं प्रकरण काय, कविताचा पती निर्दोष असतो का अशा अनेक प्रश्‍नांची यादी कथेच्या शेवटी तयार होते व त्याची उत्तरं दुसऱ्या भागातच मिळणार, हेही स्पष्ट होते.

दया हे पात्र आणि त्याची मानसिकता दाखवत सुरू झालेली ही कथा त्याच्या व्हॅनमध्ये मृतदेह सापडल्यानंतर वेग पकडते. या प्रकरणातून सुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दयाचा पाय अधिक खोलात अडकत जातो, तशी कथा मनोरंजक होते. दयाची पत्नी, कविताचा पती ही पात्रं कथेतील गूढ अधिक वाढवतात. मात्र, कविताच्या पात्राच्या लिखाणात काही चुका राहिल्या आहेत. एक अनुभवी पत्रकार आपल्या पुढील योजना सर्वांना सांगत नसतात. मात्र, सतत धक्के देण्यात व पुढं काही होणार याची उत्सुकता कायम ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे. छायाचित्रण आणि संगीत कथेला पूरक आहे.

जे. डी. चक्रवर्ती दयाच्या भूमिकेत दमदार कामगिरी करतो. लेखकानं ‘सत्या’चा संदर्भ घेत हे पात्र छान रंगवल्यानं चक्रवर्तीचं काम सोपं झालं आहे. दयाचं सत्य समोर आल्यानंतर त्याची बदलेली चाल व आवाज यांचा त्यानं केलेला उपयोग जबरदस्त. प्रभाच्या भूमिकेत जोश रवी व शबानाच्या भूमिकेत विष्णू प्रिया यांना चांगली संधी आहे. इतर कलाकार या सर्वांना चांगली साथ देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT