guns and gulaabs web series sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन : गन्स ॲण्ड गुलाब्ज : मनोरंजनाचा ‘चित्र-विचित्र’ फॉर्म्युला!

फॅमिली मॅन’ आणि ‘फर्जी’सारख्या वेब सिरीजचे दिग्दर्शक राज आणि डीके यांची ‘नेटफ्लिक्स’वरील ‘गन्स ॲण्ड गुलाब्ज’ प्रेम आणि हिंसाचार यांचं घातक मिश्रण आहे.

महेश बर्दापूरकर

फॅमिली मॅन’ आणि ‘फर्जी’सारख्या वेब सिरीजचे दिग्दर्शक राज आणि डीके यांची ‘नेटफ्लिक्स’वरील ‘गन्स ॲण्ड गुलाब्ज’ प्रेम आणि हिंसाचार यांचं घातक मिश्रण आहे. प्रेमात टोकाला जाणारे प्रेमवीर आणि दुश्‍मनीत चाकूचे वार आणि गोळ्यांची बरसात करणारे गॅंगस्टर असा सारा मामला आहे.

फारसं उत्कंठावर्धक नसलं, तरी खिळवून ठेवणारं कथानक, राजकुमार राव, दलकीर सलमान आणि गुलशन देवैया या भन्नाट कलाकारांचा अभिनय, नव्वदीच्या दशकातील संदर्भ असलेले खुमासदार संवाद यांच्या जोरावर ही वेब सिरीज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी होते.

‘गन्स ॲण्ड गुलाब्ज’ची कथा गुलाबगंज नावाच्या काल्पनिक शहरात सुरू होते. तिथल्या इंग्रजी माध्यमातील शाळेतील दोन विद्यार्थी कोणाचं प्रेम अधिक खरं यासाठी भांडत असतानाच एका गुंडाची निर्घृण हत्या होते. ही हत्या आत्माराम (गुलशन देवैया) हा कॉन्ट्रक्ट किलर करतो, तर मारला गेलेला गांचीच्या (सतीश कौशिक) गॅंगचा सदस्य असतो.

अफिमचा व्यापर करणाऱ्या गांचीला हा मोठा झटका असतो व टिपू (राजकुमार राव) हा त्या सदस्याचा मुलगा असल्याचं गांचीला समजतं. घरातील एका अपघातात गांची जायबंदी होऊन कोमात जातो व त्याचा मुलगा छोटू (आदर्श गौरव) व्यवसाय पाहू लागतो.

आत्मारामचं पुढचं टार्गेट टिपू असतो, मात्र टिपू आत्मारामच्या दोन गुंडाना मारून गांची गॅंगमध्ये सामील होतो. त्याचवेळी नार्कोटिक्स इन्स्पेक्टर अर्जुन वर्मा (दलकीर सलमान) गावात बदलून येतो. अफिमची शेती आणि त्याचा काळा बाजार याचं रॅकेट तोडण्याची जबाबदारी अर्जुनवर असते.

शाळेतील शिक्षिका चंद्रलेखा (टी. जे. भानू) टिपूच्या धडाडीवर फिदा असते, तर अर्जुनचा संसार त्याची पूर्वाश्रमीची प्रेमिका यामिनीमुळं (श्रेया धन्वंतरी) मोडण्याच्या बेतात असतो. शाळेतील मुलांच्या प्रेमप्रकरणाचा धागा मुख्य कथेला येऊन मिळतो आणि तुफान हाणामारी, नव्वदीच्या सिनेमांप्रमाणं होणारं अपहरण, नायकाचं सुटकेसाठी जीव धोक्यात घालणं आदी सोपस्करांनंतर प्रत्येकाचा बदला पूर्ण होत कथेचा शेवट होतो.

वेब सिरीजची कथा मनोरंजक आहे व पात्रंही चित्र-विचित्र आहेत. मुलगी पटवण्यासाठी इंग्रजी शिकणारा टिपू, थंड डोक्यानं आणि विशिष्ट पद्धतीनं खून करणारा आत्माराम, नोकरी, संसार आणि प्रेयसीच्या जाळ्यात अडकलेला अर्जुन, बापाच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेला छोटू या सर्वच पात्राचं लिखाण जमून आलं असल्यानं कथा पकड घेते.

शाळेतल्या मुलांचं प्रेम आणि त्याचे प्रसंग अनावश्‍यक वाटतात, मात्र त्याची संगती शेवटी जोडली जाते. नव्वदीच्या दशकातील संदर्भ, गाणी, कथेच्या भागांची त्याकाळातील सिनेमांप्रमाणं नावे, नायिकेची लुना, टेपरेकॉर्डरमध्ये अडकणाऱ्या कॅसेट, त्या काळची इंग्रजी सिनेमे या गोष्टी मजा आणतात. संगीतही सुमधुर आहे.

राजकुमार रावनं ‘ल्युडो’ या सिनेमातील मिथुन चक्रवर्तीचा लुक इथंही कायम ठेवत धमाल केली आहे. प्रेमात भावुक आणि दुश्‍मनीत निष्ठुर टिपू त्यानं मस्त साकारला आहे. गुलशन देवैयानं साकारलेला आत्माराम कथेत सस्पेन्स आणि धमाल आणतो. दलकीर सलमान इन्स्पेक्टरच्या भूमिकेत शोभून दिसतो, तर आदर्श गौरव सरप्राईज पॅकेज ठरतो. टी. जे. भानू, श्रेया धन्वंतरी यांनी चांगली साथ दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT