mahesh bhatt and pooja bhatt Team esakal
मनोरंजन

महेश भट्ट यांचं मुलीबाबतचं वादग्रस्त विधान आजही चर्चेत

"पूजा माझी मुलगी नसती तर तिच्यासोबत लग्न केलं असतं"

स्वाती वेमूल

निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट Mahesh Bhatt हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. चित्रपटांसोबतच त्यांचं खासगी आयुष्य बी-टाऊनमध्ये नेहमी लाइमलाइटमध्ये राहिलं. त्यांचा सर्वाधिक चर्चेत राहिलेला वाद म्हणजे मुलगी पूजा भट्ट Pooja Bhatt हिच्यासोबत एका मासिकाच्या कव्हर फोटोसाठी केलेलं शूट. या फोटोशूटमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत आणि प्रेक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. वादग्रस्त फोटोशूटनंतर त्यांनी एका मुलीसोबत लग्न केलं असतं, असं विधान केलं होतं.

पत्रकार परिषदेतील वादग्रस्त विधान

मासिकाच्या फोटोशूटमुळे वाद निर्माण झाल्यानंतर महेश भट्ट यांनी एक पत्रकार परिषद घेतली. मात्र या परिषदेमुळे वाद शमला नाही तर तो आणखी चिघळला. "जर पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केलं असतं", असं विधान त्यांनी या पत्रकार परिषदेत केलं होतं. या वक्तव्यानंतर मोठा वाद झाल्याने त्यांनी सारवासारव करत नैराश्यात असल्याचं कारण दिलं. सर्व बाजूंनी होणारे आरोप, जीवे मारण्याच्या धमक्या या सर्व गोष्टींमुळे मी नैराश्यात गेलो होतो आणि म्हणूनच माझ्याकडून ते विधान चुकून गेलं, असं स्पष्टीकरण महेश भट्ट यांनी नंतर दिलं होतं.

मासिकाचं फोटोशूट वादग्रस्त का ठरलं?

महेश भट्ट यांनी मुलगी व अभिनेत्री पूजा भट्ट हिच्यासोबत एका मासिकासाठी फोटोशूट केलं होतं. या फोटोमध्ये हे दोघं लिप टू लिप किसिंग करताना दिसतात. हा फोटो प्रसिद्ध होताच मोठा वाद निर्माण झाला. सर्वसामान्यांकडून, चाहत्यांकडून दोघांवर जोरदार टीका होऊ लागली होती. इतकंच नव्हे तर महेश भट्ट यांना जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा येऊ लागल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT