mahesh bhatt 
मनोरंजन

महेश भट्ट यांनी लैंगिक अत्याचार प्रकरणावर सादर केला जबाब

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सिनेदिग्दर्शक आणि निर्माता महेश भट्ट यांचं नाव सध्या अनेक वादविवादांमध्ये चर्चेत आहे. एकीकडे महेश भट्ट यांचं नाव सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात घेतलं जातंय तर दुसरीकडे त्यांच्या 'सडक २' या आगामी सिनेमाच्या ट्रेलरला युट्युबवर लोकांनी मोठ्या प्रमाणावर डिसलाईक केलंय. या व्यतिरिक्त महेश भट्ट यांच्यावर आरोप आहे की ते एका अशा कंपनीचा प्रचार करत आहेत जिच्यावर महिलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी केस सुरु आहे. या प्रकरणात महेश भट्ट यांना महिला आयोगाने नोटिस पाठवली होती ज्यावर त्यांनी आता जबाब नोंदवला आहे.

आयएमजी वेंचर्स नावाच्या कंपनीने त्यांच्या मिस्टर एँड मिस ग्लॅमर २०२० या इवेंटमध्ये महेश भट्ट सोबतंच उर्वशी रौतेला, ईशा गुप्ता, रणविजय सिंह, मौनी रॉय आणि प्रिंस नरुला यांची नावं वापरली होती. आता महिला आयोग या कंपनीवर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तपास करत आहेत. याच्याशी संबंधित सगळे सेलिब्रिटींना महिला आयोगातर्फे नोटीस पाठवली गेली होती. 

महेश भट्ट आणि त्यांची होम प्रोडक्शन कंपनी विशेष फिल्म्सद्वारे जबाब सादर करण्यात आला आहे. यात म्हटलं आहे की महेश भट्ट यांचं आयएमजी वेचंर्स कंपनीसोबत काहीही देणंघेणं नाहीये. त्यांचं नाव त्यांच्या परवानगीशिवाय वापरलं गेलं आहे. 

अधिकृत जबाबात महेश भट्ट यांनी लिहिलंय, 'मी राष्ट्रीय महिला आयोगाला सलाम करतोय की त्यांनी अशा काही संस्थांवर कारवाई केली आहे ज्या इंडस्ट्रीमध्ये महिला लैंगिक अत्याचाराला प्रोत्साहन देत आहेत. या गोष्टीसाठी मी महिला आयोगाचा आभारी आहे. मी आज माझ्यावर लावलेल्या आरोपांच्या संदर्भात आयोगाच्या समोर हजर झालो. आयएमजी वेंचर्सने नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांच्या प्रमोशनल इवेंट मिस्टर ऑर मिसेस ग्लॅमर  २०२० मध्ये माझ्या नावाचा वापर केला आणि मला आमंत्रण दिलं की मा या इवेंटचा भाग बनू शकू.

मी आयोगाच्या चेअरपर्सनना स्पष्ट सांगू इच्छितो की मला या एवेंटसाठी मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केलं गेलं होतं मात्र कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मी नकार दिला. या इवेंटसाठी कोणत्याही प्रकारचा करार केलेला नाही. मात्र कंपनीने माझ्या परवानगीशिवाय माझ्या नावाचा वापर केला. जेव्हा मी याबाबात विचारलं तेव्हा त्यांनी यासाठी माफी मागितली. त्यानंतर माझं नाव आणि फोटो प्रत्येक गोष्टीतून काढून टाकण्यात आलं. या कंपनीसोबत माझा कोणताही संबंध नाही. माझ्या नावाचा वापर यासाठी केला गेला होता जेणेकरुन त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील.' 

त्यांनी पुढे म्हटलंय की 'वयाच्या ७१ व्या वर्षात मी ज्ञान वाटण्यासाठी आणि सामाजिक कामांत सहभागी होण्यावर विश्वास ठेवतो. तीन मुलींचा बाप आहे आणि या धर्मयुद्धात मी पूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार आहे.' 

mahesh bhatt appears before ncw in sexual harassment case

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambernath: काय हा निर्लज्जपणा! भ्रष्टाचार करा पण अति नको; उपनगराध्यक्षाचं सभागृहातच विधान, नगरसेवक दात काढून हसले

Where is Cabo Varde? मेस्सी अन् अर्जेंटिनाची झोप उडवणारा केप व्हर्दे कुठेय माहित्येय? ५ लाख लोकसंख्या, दहा बेटांचा एक देश, जो नकाशात शोधूनही सापडत नाही...

Latest Marathi Live Update: कोंढव्यात रस्ते खोदकामामुळे भीषण वाहतूक कोंडी

Nashik Hotel FDA Raid : अन्न व औषध प्रशासनाचा राज्यभर मोठा धडाका! नाशिकमध्ये 20 हॉटेल्सवर अचानक धाड; 4 हॉटेल्स तातडीने बंद करण्याचे आदेश, 9 परवाने निलंबित

PF New Rule: PF मध्ये 1800 रुपयांपेक्षा जास्त जमा करायचे का? नवीन नियमात कुणाचा फायदा, कुणाचे नुकसान?

SCROLL FOR NEXT