Mahesh Bhatt Bigg Boss 2 Manisha Conversation esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT2 : 'तू फक्त माझ्या डोळ्यात बघ, तुला...' मनिषाला पाहिलं अन् महेश भट्ट वय विसरले!

महेश भट्ट यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे..

युगंधर ताजणे

Mahesh Bhatt Bigg Boss 2 Manisha Conversation : टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या बिग बॉस ओटीटी २ ने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतला आहे. आता हा शो शेवटच्या टप्प्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यात वेगवेगळ्या घडामोडी रंगताना दिसत आहे. यंदाच्या सीझनमध्ये एल्विश आणि मनिषा यांच्यातील वादानं वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे.

आता बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. सोशल मीडियावर महेश भट्ट हे चर्चेत आले आहेत. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते बिग बॉसच्या घरातील मनिषाशी संवाद साधत आहेत. बिग बॉसमध्ये महेश भट्ट यांचा तो व्हिडिओ अनेकांच्या चर्चेचे कारण ठरताना दिसत आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

भट्ट हे बिग बॉसच्या घरात येताच मनिषा त्यांच्या पाया पडताना दिसते. त्यावर भट्ट तिला तसे न करण्याचा सल्ला देतात. माझ्या पाया पडू नको.त्यानंतर मी तुझ्यासाठी आलो आहे. तुझी एक वस्तू माझ्याकडे आहे. ती तुला द्यायची आहे. तू अजिबात कोणत्याही गोष्टीचे वाटून घेऊ नकोस. माझ्या डोळ्यात बघ...अशा शब्दांत भट्ट यांनी मनिषासोबत संवाद साधला आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

महेश भट्ट सध्या ट्विटरवर ट्रेंड करताना दिसत आहे. त्यावरुन त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले आहे. आपलं वय काय आपण करतो काय याचे भान भट्ट यांनी ठेवणे गरजेचे आहे. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी भट्ट यांना दिल्या आहेत. टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय अशा रियॅलिटी शो मध्ये भट्ट यांची पहिल्यांदाच इंट्री झाली असून त्यांच्या आणि मनिषातील त्या व्हायरल व्हिडिओनं अनेक प्रश्नांना तोंड फुटले आहे.

बिग बॉस ओटीटी 2' सध्या खुपच चर्चेत आलं आहे. आता काहीच स्पर्धक या शोमध्ये उरले आहेत. त्यात वाईल्ड कार्ड एंट्रीत घरात आलेला एल्विश यादव सगळ्या घराला त्याच्या बोटावर नाचवत आहे. त्याने घरात येताच घराचा ताबा मिळवला आणि चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली. तो घरात येताच बाकिच्या स्पर्धकांच्या लोकप्रियतेत खुपच घट झाल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT