Mahesh Kale Classical Singer  esakal
मनोरंजन

Mahesh Kale : रोजानंतर 'हम्मा हम्मा' च्या गाण्यानं नेटकऱ्यांचा चढला पारा! 'कुठं गेली हम्मा..'

प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळेनं त्याच्या बहारदार गायकीनं चाहत्यांची नेहमीच पसंती मिळवली आहे.

युगंधर ताजणे

Mahesh Kale Marathi Classical Singer trolled : प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळेनं त्याच्या बहारदार गायकीनं चाहत्यांची नेहमीच पसंती मिळवली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक म्हणूनही वेगळी ओळख असणाऱ्या महेशच्या एका कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामुळे त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले आहे.

आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतील गायकीसाठी महेशच्या मैफलीला चाहत्यांची नेहमीच गर्दी होत असते. दिवाळी पहाट असो की पाडवा या निमित्तानं महेशच्या सुरांमध्ये चाहते चिंब होत या सणांचा आनंद घेताना दिसतात. मात्र आता महेशनं बॉलीवूडच्या एका चित्रपटातील गाणी थोड्याशा वेगळया ढंगात सादर केल्यानंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रियांनी वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे महेशवर नेटकऱ्यांनी सडकून टीकाही केली आहे.

Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

वास्तविक महेश सारख्या गायकाकडून अशाप्रकारच्या परफॉर्मन्सची अपेक्षा नव्हती. महेशनं हे काय सुरु केले आहे, त्यामागे काय कारण आहे असे प्रश्नही त्याला विचाण्यात आले आहे. त्याचे झाले असे की, एका संगीत कार्यक्रमामध्ये महेशनं रोझा या चित्रपटाली रोजा जाने मन गाणे गायले. त्याला प्रेक्षकांनी दाद दिली मात्र सोशल मीडियावर तो व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा मात्र त्याच्यावर नेटकऱ्यांनी सडकून टीकाही केली आहे.

महेशनं ज्या सुरावटीच रोजा रोजा सादर केलं त्यावरुन नेटकऱ्यांनी तयार केलेल्या मीम्सला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर आता बॉम्बे चित्रपटातील हम्मा हम्मा गाणं ही महेशनं गायलं आणि तो पुन्हा ट्रोल झाल्याचे दिसून आले आहे. त्यावरील व्हायरल मीम्स देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. महेशनं चाहत्यांचे कोणत्या प्रकारे मनोरंजन केले असा प्रश्न त्याला ट्रोलर्सनं विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT